सव्वा कोटी रुपयांचा अपहार : पतसंस्थेचे व्यवस्थापकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

सातारा : भवानी पेठेतील महेश नागरी पतसंस्थेत खोटी कागदपत्रे तयार करून सव्वा कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिल जयसिंग जाधव (रा. करंडी, ता. सातारा) यांच्यासह सहा जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत सनदी लेखा परीक्षक हेमंत अनंत कुलकर्णी (रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
 भवानी पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिल जाधव २००३ ते २०१३ या काळात महेश नागरी पतसंस्थेचा कारभार पाहत होते. संस्थेचे सर्व रेकॉर्ड त्यांच्या नियंत्रणात होते. त्यांनी अधिकाराचा वापर करून खोटी कागदपत्रे तयार केली. त्याच्या आधारे विविध कर्ज व सेव्हिंग खात्यामध्ये खोटे हिशेब जमा-खर्च लिहिले. तसेच रेकॉर्डमध्ये व्हाईटनरच्या साह्याने खाडाखोड केली. नोंदी बदलून सुधीर जयसिंग जाधव, विजया अनिल जाधव, जयसिंग मानसिंग जाधव (सर्व रा. करंडी), अजित श्रीमंत देशमुख व शिवाजीराव बाजीराव देशमुख (दोघे रा. मांडवे, ता. सातारा) यांच्या संगनमताने संचालक मंडळाची परवानगी नसताना १ कोटी २१ लाख ८ हजार रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: case file against 6 people including the credit society manager for six crores rupees fraud

टॅग्स