पेपरवेट फेकून मारले; मुख्याध्यापिकेसह तिघांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

संशयित आरोपींनी ऍडमिशनसाठी 20 हजार रुपये मागितले. इतके पैसे देऊ शकणार नाही असे म्हणाल्यानंतर "तुम्हारी हैसियत नही है तो मत पढाओ' असे म्हणून फिर्यादी शरीफाबी, सासू सुरया शेख, दीर अमजद शेख यांना शिवीगाळ केली.

सोलापूर : मुलाच्या ऍडमिशनसाठी गेल्यानंतर सोशल इंग्लिश मीडियम शाळेत पेपरवेट फेकून मारल्याप्रकरणी मुख्याध्यापिका सोलेहा वडवान, शहानवाज जमादार व आणखी एकावर गुन्हा दाखल झाला.

शरीफाबी फारूक शेख (वय 23, रा. बेगम पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली. ही घटना शुक्रवारी सकाळी पावणे बाराच्या दरम्यान घडली.

संशयित आरोपींनी ऍडमिशनसाठी 20 हजार रुपये मागितले. इतके पैसे देऊ शकणार नाही असे म्हणाल्यानंतर "तुम्हारी हैसियत नही है तो मत पढाओ' असे म्हणून फिर्यादी शरीफाबी, सासू सुरया शेख, दीर अमजद शेख यांना शिवीगाळ केली. ऑफिसमधून बाहेर काढून मुलगा अलहदी शेख यास पेपरवेट फेकून मारल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: case filed against principal in Solapur

टॅग्स