जादा दराने पेट्रोल, डिझेल विक्री प्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

सरस्वती हिंदुस्तान पेट्रोलियम पंपाचे विक्रेते, व्यवस्थापक आणि मालक यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. पोलिस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

कऱ्हाड : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर सध्या जीवनावश्यक वस्तुंची वाहने, प्रशासन, पोलिस, आरोग्य विभागाची वाहने यांनाच पेट्रोल डिझेल देण्याचे आदेश आहेत. मात्र ते देताना ओगलेवाडी रस्त्यावरील एका पंपावर पेट्रोल व डिझेलची जादा दराने विक्री करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत हवालदार आर. एस. जाधव यांनी फिर्याद दिली. ओगलेवाडी रस्त्यावरील सैदापुर (ता. कऱ्हाड) हद्दीतील सरस्वती हिंदुस्तान पेट्रोलियम पंपाच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या संचारबंदी लागु करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापनाची कार्यवाही सुरु केली आहे. त्याअंतर्गत कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना पेट्रोल देण्याबाबत सूचित केले आहे. मात्र ते जादा दराने विक्री करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्याबाबत हवालदार आर. एस. जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून आणि पेट्रोल व डिझेल पंपावरुन ते वाजवी दराने देण्याचे आदेशही आहेत. तरीही पेट्रोल 78 रुपये 64 पैसे असताना ते 80 रुपयांनी तर डिझेल 64 रुपये 68 पैसे असताना 70 रुपयांनी विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पेट्रोल व डीझेलची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांना त्याची माहिती दिली. त्यांच्या सुचेनेनुसार सरस्वती हिंदुस्तान पेट्रोलियम पंपाचे विक्रेते, व्यवस्थापक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. पोलिस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

पोलिसांनी विनाकारण मारहाण करु नये : गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई 

कऱ्हाड ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांचे आगाऊ धान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पाटण तालुक्यात धान्य आल्यानंतर तात्काळ त्याचे वाटप करा, अशा सुचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान संचारबंदी काळात हुल्लडबाजांना चोप द्या, मात्र कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांना विनाकारण पोलिसांनी मारहाण करु नये, अशा सुचना पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत. त्याची आंमलबजावणी पोलिसांनी करावी, असे आदेशही त्यांनी पोलिसांना दिल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

लॉकडाऊनमध्ये औषधे अन् किराणा दुकानांबद्दल मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Registered Against Administrator Of Petrol Pump In Karad