खाजगी कंपनीमुळे शासकीय पाझर तलावास धोका

चंद्रकांत देवकते
बुधवार, 11 एप्रिल 2018

मोहोळ (जि. सोलापूर) : लांबोटी येथील शासकीय पाझर तलावाच्या हद्दीत झुआरी अॅग्रो लिमीटेड गोवा या कंपनीने शेततळे व विहीर खोदुन शासकीय पाझर तलावास धोका निर्माण केल्याप्रकरणी झुआरी अॅग्रो कंपनीचे व्यवस्थापक डी.जे. लिगाडे याच्याविरूद्ध मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना ता. ११ रोजी घडली .

 याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे लांबोटी परिसरात शासकीय मालकीचे गट नं ७७ ते ८१ या गटामध्ये ११.२०  हेक्टर एवढया क्षेत्रामध्ये पाझर तलाव आहे . पाझर तलावाच्या लाभक्षेत्रामध्ये २०० मिटर अंतराच्या आत उत्खनन करण्यास महाराष्ट्र इरिगेशन अॅक्ट १९७६ अन्वये १०५ , १०७ , १०८ नुसार मनाई आहे . तसेच महाराष्ट्र शासन परिपत्रकामध्ये अशा कामास मनाई आहे . तरीही तलावाच्या पश्चिमेस झुआरी कंपनीने स्वताच्या मालकीच्या गट नं ७३ मध्ये तलावाच्या मुख्य भरावापासुन ११.२० मिटर अंतरावर २२ मिटर व्यासाची विहीर खोदली आहे . तसेच ५० मिटर अंतराच्या आत माती , मुरूम उत्खनन करून पाणी साठविण्यासाठी मोठे शेततळे बांधले आहे . यामुळे शासकीय पाझर तलावास धोका निर्माण झाला होता .

याबाबत पाण्याचा योग्य तो निचरा करावा म्हणुन ७-९  -१७ व १२ -९-१७ , ता. ३०-१ -१८ या कालावधीत लघुपाटबंधारे विभागाने विहीर बुझवुन पाण्याचा निचरा करण्याबाबत लेखी सुचना दिल्या होत्या .पंरतु याबाबत कंपनीने कोणतेही दखल न घेतल्याने पाझर तलावाच्या पाण्यामध्ये सातत्याने घट होत होती .पाझर तलावास धोका निर्माण होऊन तलाव खचू लागल्याने झुआरी कंपनीचे व्यवस्थापक डी.जे. लिगाडे यांच्या विरुद्ध लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी.बी. भोसले यांनी महाराष्ट्र इरिगेशन अॅक्ट १९७६ प्रमाणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा ४३० ,४२७ , नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम बोधे करीत आहेत.

Web Title: Case registered against a private company in solapur