कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला पाचशेच्या केवळ 15 नोटा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर : नोटा तुटवड्याने हैराण झालेल्या करवीरवासीयांना 500 रुपयांच्या नोटेची प्रतीक्षा होती. आज जिल्ह्यात 500 रुपयांच्या नोटा आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले; पण पाचशेच्या या नोटा दहा ते पंधराच असल्याचे समजताच नोटा वाटणार कोणाला, असाही सवाल करण्यात येत आहे. 

जिल्ह्यात 535 एटीएम आहेत. उद्यापासून यातील 70 टक्के एटीएम सुरू होतील. नोटांचा ओघ वाढत असल्याचे बॅंकांकडून सांगितले जाते. 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास आणि त्या खर्च करायच्या कोठे, हा मोठा प्रश्‍न आहे.

यातच 500 रुपयांच्या नोटा आल्या तर व्यवहार सुरळीत होतील, अशी शक्‍यता आहे. त्यामुळे पाचशे रुपयांच्या नोटांची प्रतीक्षा होती. आज या नोटा आल्या आहेत; पण त्या दहा ते पंधराच आहेत, त्यामुळे त्या वाटायच्या कोणाला आणि ठेवायच्या तर कशा, असा सवाल केला जात आहे.

रिझर्व्ह बॅंकेकडून दररोज 200 ते 250 कोटीच्या नोटा येतात. यामध्ये 100 आणि दोन हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. पाचशे रुपयांच्या नोटा मिळाल्यानंतर लोकांना व्यवहार करण्यास सोईचे ठरणार आहे. यात सहकारी बॅंकांनाही या नोटा वितरीत करता येत नसल्याने लाखो लोकांना नोटांसाठी कासाविस व्हावे लागत आहे. 

Web Title: Cash crunch continues in Kolhapur after demonetisation