विहिरीत पडलेल्या जंगली मांजराची सुटका (व्हिडिओ)

cat
cat

सोलापूर : कुर्डुवाडी परिसरात तीन दिवसांपासून 50 फूट खोल विहिरीत अडकलेल्या जंगली मांजराला बाहेर काढण्यात वन्यजीवप्रेमींना यश आले आहे. 

कुर्डुवाडीतील एका विहिरीत जंगली मांजर पडले होते. याची माहिती मिळाल्यानंतर प्राणीमित्र आबा असवरे यांनी धाव घेतली. जंगली मांजराने कबुतरांची शिकार केली होती. त्यामुळे ते स्वस्थ बसले होते. मांजराला कोणतीही इजा ना करता विहिरीतून बाहेर काढणे कौशल्याचे काम होते. खोल विहिरीत उतरणे शक्‍य नसल्याने तेथे पिंजरा लावणे अशक्‍य होते. मांजर शांत बसले असताना दोरीच्या सहायाने छोटा फास तयार करण्यात आला. दोरीचा फास टाकून मांजराला बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर लगेच मांजराला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. 

आबा असवरे यांनी आजवर कोल्हे, हरिण, साप अशाच पद्धतीने खोल विहिरीतून बाहेर काढले आहेत. आजपर्यंत हजारो साप आणि वन्यप्राण्यांचे जीव वाचवलेल्या आबा असवरे यांचे प्रत्यक्ष अनुभव वाखाणण्याजोगे आहेत. या रेस्क्‍यूमध्ये निसर्गप्रेमी केदार ढेपे यांनीही सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com