गुरांच्या व्यापाऱ्याने "यासाठी' घेतला गळफास 

गुरांच्या व्यापाऱ्याने "यासाठी' घेतला गळफास 

वैराग (जि. सोलापूर) ः खासगी पैसे देण्याच्या व जमिन नापिकीच्या कारणामुळे 55 वर्षीय शेळ्या व जनावरांच्या व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मानेगाव (धाकटे ) (ता. बार्शी) येथील ही घटना असून मच्छिंद्र ईश्वरा सोलनकर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी पहाटे पाच ते साडेसातच्या दरम्यान घडली. 

दरम्यान, मृतदेहाजवळ डायरी सापडली आहे. त्यामध्ये आठ ते दहा जणांची नावे असून ते देणी देत नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप करुन नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर दुपारी पोलिसांनी मध्यस्थी करून दोषीवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद वैराग पोलिसांत आकस्मात मयत म्हणून केली आहे. 

याबाबत वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मानेगाव (ता. बार्शी) येथील मच्छिंद्र ईश्वरा सोलनकर हे शेळ्या, मेंढ्या, बोकडे व जनावरे खरेदी - विक्रीचा व्यापार करत होते. अल्पभूधारक असलेल्या सोलनकर यांना नापिकी व व्यापारात मोठा तोटा सहन करावा लागला. शेतात पिके नाहीत. व्यापारात फायदा न येता तोटा सहन करावा लागला. आर्थिक गर्ग्यात सापडलेल्या सोलनकर यांनी व्यापारासाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेत होते. धंद्यात विकलेली जनावरे घेतलेल्यांनी पैसे दिले नाही. सावकार मात्र रोज तगादा लावू लागल्याने गुरुवारी पहाटे पाच ते साडेसातच्या दरम्यान गट क्रमांक 145 मधील आंब्याच्या फांद्याला दोरीने गळफास घेतला. खासगी पैसे देण्याच्या व जमिन नापिकीच्या कारणामुळे ही आत्महत्या केल्याची खबर मयताचा भाऊ गोरख सोलनकर यांनी दिली आहे. मृत सोलनकर यांच्या पश्‍चात्य पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची नोंद आकस्मात मयत म्हणून झाली असून प्रेताचे श्ववविच्छेदन व व्हिसेरा राखून ठेवला असल्याचे तपास अधिकारी पोलिस हेडकॉन्स्टेबल अमित घाडगे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com