सांगलीच्या आमराई उद्यानात सीसीटीव्ही, म्युझिक सिस्टीम

सांगलीच्या आमराई उद्यानात सीसीटीव्ही, म्युझिक सिस्टीम

सांगली -  आमराई उद्यानात सीसीटीव्ही बसवणे, म्युझिक सिस्टीम बसवणे, लाईट व्यवस्था करणे ही कामे महापौर संगीता खोत यांच्या आदेशाने सुरू झाली आहेत. तसेच लवकरच ओपन जिमसह चांगल्या सुविधा देण्याचे नियोजन असल्याचे महापौर संगीता खोत यांनी सांगितले.

सांगलीचे वैभव असलेल्या आमराई उद्यानमध्ये महापालिका आणि सांगलीकरांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी महापौर संगीता खोत बोलत होत्या.

आज सकाळी झालेल्या या स्वच्छता अभियानात महापौरांसह आयुक्त रवींद्र खेबुडकर, मनपाचे  अधिकारी, कर्मचारी यांच्यासह प्रभाग समिती दोनचे सभापती जगनाथ ठोकळे तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी आमराई उद्यानातील प्लॅस्टीक, कचरा गोळा करून स्वच्छता केली.

आमराई उद्यानमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सकाळी चालण्यासाठी, योग, व्यायाम करण्यासाठी येत असतात. आमराई उद्यान स्वच्छ राहावे,  या उद्देशाने ते नेहमी प्रयत्न करीत असतात. पिण्यास स्वच्छ पाणी उपलब्ध करून देऊन पार्कींग सोय करणे तसेच ओपन जिम बसवण्याची यावेळी माॅर्निंग वाॅकला नियमित येणार्‍या नागरिकांनी मागणी केली.  

कामगार अधिकारी  चंद्रकांत आडके , जन संपर्क अधिकारी डी. व्ही. हर्षद, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते , उद्यान अधीक्षक , एस. एस. कोरे तसेच विभाग प्रमुख,  कर्मचारी  यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com