श्री स्वामी समर्थ मंदिरात भक्तिभावाने गुरुपौर्णिमा साजरी
अक्कलकोट : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात आज गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचे पूजनीय दिवस, अशा या पूजनीय दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेदिवशी स्वामींचे दर्शनास भाविक विशेष महत्व देत असून आज दिवसभरात असंख्य भाविकांनी या पावन दिवशी स्वामींचे दर्शन घेऊन कृतार्थ झाले. पहाटे 5 वाजता समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या व भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे पुरोहित मोहन पुजारी यांनी श्रींची काकड आरती केली.

त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले करण्यात आले. स्वामी भक्तांच्या दर्शन रांगेची सोय मंदिराच्या दक्षिण महाद्वार परिसरातील शेडमध्ये बॅरेकेटींग करून करण्यात आली होती. सकाळी 7 नंतर भाविकांची रांग नवशा मारुती मंदिरापर्यंत लांबली होती. ती सायंकाळपर्यंत भाविकांच्या वाढत्या ओघामुळे कायम राहिले. चंद्रग्रहणच्या वेधामुळे 11.30 वाजता होणारे नैवेद्य आरती सकाळी 10 वाजता करण्यात आले. तदनंतर सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले. स्वामी भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना टप्या टप्याने दर्शनास सोडण्यात आले. चंद्रग्रहण असल्याने गुरुपौर्णिमेदिवशी देवस्थानच्या वतीने भाविकांना देण्यात येणारे भोजन महाप्रसाद उद्या शनिवारी मैंदर्गी रोडवरील भक्त निवास येथे देण्यात येणार आहे.
सर्व स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने करण्यात आले आहे. गुरूपौर्णिमे निमीत्त आज आमदार सिध्दाराम म्हेत्रे, शिवराज म्हेत्रे, आदी मान्यवरांसह अनेक स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेशजी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. शिवशरण आचलेर, पाटील सर, श्रीनिवास इंगळे, मंगेश फुटाणे, गिरीश पवार, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, अमर पाटील, संतोष पराणे व देवस्थानचे कर्मचारी व सेवेकर्यानी परिश्रम घेतले.