भगवंत महोत्सवात संगीत रजनीवर बार्शीकर थिरकले

सुदर्शन हांडे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

बार्शी (सोलपूर) : भगवंत महोत्सवातील पाचव्या दिवशी बार्शीतील भगवंत मैदानावरील वतातवरण संगीतमय होऊन गेले. या ठिकाणी सादर करण्यात आलेल्या हिंदी, मराठी गाणी, लावण्या यावर अक्षरशः बार्शीकर थिरकले. आय है राजा लोगो रे लोगो या गाण्यावर मैदानावर उपस्थित सर्वच लोकांनी ठेका धरला.

बार्शी (सोलपूर) : भगवंत महोत्सवातील पाचव्या दिवशी बार्शीतील भगवंत मैदानावरील वतातवरण संगीतमय होऊन गेले. या ठिकाणी सादर करण्यात आलेल्या हिंदी, मराठी गाणी, लावण्या यावर अक्षरशः बार्शीकर थिरकले. आय है राजा लोगो रे लोगो या गाण्यावर मैदानावर उपस्थित सर्वच लोकांनी ठेका धरला.

येथील भगवंत मैदानावर बार्शी नगरपालिका व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भगवंत महोत्सव समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या असलेल्या भगवंत महोत्सवाच्या पाचव्या दिवशी आर्यन इव्हेंट सोलापूर निर्मित संगीत रजनी कार्यक्रमात भावगीते, भक्तिगीते, कॉमेडी, लावणी, हिंदी मराठी गीतांचा नजराणा,लोकगीते सादर करून प्रेक्षकांच्या टाळया शिट्टया घेत कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर जाऊन थांबला.

प्रारंभी भाजप नेते राजेंद्र मिरगणे, न प शिक्षण मंडळाचे माजी सभापती पांडुरंग गव्हाणे यांच्या हस्ते भगवंत प्रतिमा पूजन व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, जेष्ठ विधिज्ञ ऍड परशुराम करंजकर, विलास ठोकडे, जे बी कोरके, एम पी धस, भारत बारवकर, रवींद्र बुडुख, महादेव बारंगुळे, बाळासाहेब गव्हाणे, मधुसूदन चांडक, राजकुमार कांकरिया, साहेबराव देशमुख यांच्यासह नगरपालिका, भगवंत देवस्थान ट्रस्ट तसेच भगवंत महोत्सव समितीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात दर्शन दे रे भगवंता, सत्यम शिवम सुंदरम, हमे और जीनेकीं चाहत ना होती, माझ्यावर रसिक जणांच्या नजरा,दिलबरा करते मी मुजरा ही स्वप्नाली बार्शी कर हिने सादर केलेली लावणी लक्षवेधी ठरली.करिष्मा कोल्हापूरकर व टीमची खेळताना रंग बाई होळीचा फाटला ग कोणा माझ्या चोळीचा. ह्यो लय भरलाय मनात ग ही सुजाता कुंभार ची सुपरफास्ट लावणी डोक्यावर घेतली. अंशुमन विचारे आणि नियती राजवाडे यांनी कॉमेडी एक्स्प्रेस  मधून शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संवादातून हास्यांचा फवारा उडवून दिला.

मी आजवर राज्यात भरपूर ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने फार फिरलो मात्र अशा प्रकारची गर्दी आणि प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मी पाहिला नाही.. नेटके नियोजन करणाऱ्या महोत्सव समिती पालिकेला धन्यवाद.भगवंताची सेवा करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी धन्य झालो अशी भावना उपनगरीय नाट्य शाखेचे अध्यक्ष दादा साळुंके यांनी व्यक्त केली. 

भगवंत मैदानावर आज सायंकाळी बार्शी व परिसरातील स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम होणार आहे.आपल्या कलाकारांना पाहण्यासाठी बार्शी करांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीधर कांबळे व अध्यक्ष सुभाष लोढा यांनी केले आहे.

Web Title: celebrates bhagwant mahotsav by barshi citizens