तारळेतील पारंपारिक शिवजयंती उत्साहात साजरी

यशवंतदत्त बेंद्रे
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

तारळे - येथील ऐतिहासिक राजेमहाडीक घराण्यातर्फे 1920 पासून साजरी करण्यात येत असलेली शिवजयंती याही वर्षी परंपरेने साजरी करण्यात आली. प्रतिवर्षा प्रमाणे तारळे प्राथमिक शाळेची मुले व मुली भानजी राजेमहाडीक यांच्या ऐतिहासिक वाड्या समोर आल्यावर शिवप्रतिमा, सजविलेल्या पालखीत ठेऊन त्याचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ऐतिहासिक पद्धतीने गावातून मिरवणूक काढण्यात आली. 

ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. सरपंच अर्चना जरग व उपसरपंच रामचंद्र देशमुख यांनी शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
त्यानंतर मिरवणुकीचे छोटेखानी सभेत रूपांतर झाले. येथे विद्यार्थ्यांची भाषणे झाली. 

अनेक विद्यार्थ्यांनी पोवाडे व ऐतिहासिक सादरीकरण केले. मुलांनी शिवकालीन पोशाख परिधान केले होते. त्याचे सर्वांनी कौतुक केले. उपसरपंच रामचंद्र देशमुख अध्यक्ष स्थानी होते. 

यावेळी कृष्णाराजे राजेमहाडीक, रामभाऊ लाहोटी, रामचंद्र देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी शिलासिंग राजेमहाडीक, भानजी राजेमहाडीक, बाळासाहेब राजेमहाडीक, निलेश राजेमहाडीक, ग्रामपंचायत सदस्य युवराज नलवडे, श्रीधर जाधव, शुभांगी उंडाळे, गणेश मायणे, मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, चारुशीला मायणे, संदीप राजेमहाडीक, जयदीप राजेमहाडीक, संग्राम राजेमहाडीक, कृष्णकांत राजेमहाडीक आदींसह राजेमहाडीक परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी राजेमहाडीक यांनी मुलांसह सर्वांना खोबऱ्याच्या बर्फीचे वाटप केले.

येथील राजेमहाडीक घराण्यात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कन्या अंबिकाबाईराजे व श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या कन्या भवानीबाईराजे दिल्या होत्या. यातील भवानीबाईराजे या पती बरोबर सतीही गेल्या होत्या त्यांची समाधी आजही येथे पाहवयास मिळते. त्यामुळे ऐतिहासिक असलेल्या राजेमहाडीक घराण्याच्या शिवजयंती उत्सवाला विशेष महत्व आहे. पुढील वर्षी या परंपरेला 100 वर्ष होत असल्याने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी कृष्णाराजे राजेमहाडीक यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrating the traditional Shiv Jayanti in Tarale