समाधानकारक पावसासह मुबलक चाऱ्याची नागनाथाच्या यात्रेत झाली भाकणुक 

चंद्रकांत देवकते
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मोहोळ (सोलापूर) : या वर्षी पाऊस समाधानकारक असुन जनावरांचा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, तसेच केंद्रातील सरकार निर्धास्त असेल अशी भाकणुक श्री क्षेत्र मोहोळ येथील नागनाथ यात्रेनिमित्त खर्गासह निघालेल्या मिरवणुकीत नागनाथांचे मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांनी  केली.

मोहोळ (सोलापूर) : या वर्षी पाऊस समाधानकारक असुन जनावरांचा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, तसेच केंद्रातील सरकार निर्धास्त असेल अशी भाकणुक श्री क्षेत्र मोहोळ येथील नागनाथ यात्रेनिमित्त खर्गासह निघालेल्या मिरवणुकीत नागनाथांचे मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांनी  केली.

मोहोळसह आसपासच्या पंचक्रोशीतील भावीकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री नागनाथांची यात्रा (ता. १६) एप्रिल पासुन सुरू झाली असुन गुरूवारी (ता .१९) पहाटे चार वाजता खर्गाची पालखीसह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी श्री नागनाथ महाराजांचे मुख्य मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांच्या शरीरामध्ये वायु रूपाने श्री नागनाथांचा संचार झाल्यानंतर त्यांची पालखीसह सर्व मानकऱ्यांच्या उपस्थितीत हजारोच्या साक्षीने भव्य मिरवणुक निघाली.

प्रथमत, मंदिराच्या मुख्य दिल्ली दरवाजामध्ये देशातील राजकीय परिस्थितीवर भाकणूक झाली. खर्गे महाराजांच्या संचार अवतारातील सांकेतिक खुणांवरून त्या बाबत अनुभवी लोक व भाविक अनेक वेगवेगळे अंदाज व्यक्त करीत असतात.

त्यानंतर खर्ग डोह येथे नागनाथांचे मुख्य मानकरी खर्गे महाराज (संचार अवतारातील) व शिष्य हेग्रस महाराजांच्या वर्तमान वंशजाचा नयनरम्य भेटीचा सोहळा संपन्न झाला. येथेच पाऊस पाण्याची भाकणूक झाली. या भेटीमध्ये  अरूणबुवा मोहोळकर व खर्गे महाराज या गुरु शिष्य भेटीचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी पहाटे चार वाजता महिलांसह हजारों नागेश भक्तांनी खर्ग तिर्थावर गर्दी केली होती.

यानंतर काकडे पार, मुंगीचा धोंडा आदी ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात  भाकणुक करण्यात आली. पालखीसह निघालेली ही खर्गे महाराजांची मिरवणूक साकी व अभंग म्हणत परत मंदिरात पोहचली. या ठिकाणी महाआरती होऊन मानाप्रमाणे आहेर झाले. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी हिंदु - मुस्लीम बांधवासह विविध जाती धर्मातील हजारो भक्तगण सह उपस्थित होते. रविवारी (ता. २२) मुख्य यात्रा गणासह खर्गाची भव्य मिरवणूक होणार असून यावेळी लाखो भक्त गण उपस्थित राहतात. यात्रा शांततेत व शिस्तीने पार पडण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के व त्यांचे सर्व सहकारी सीसीटीव्हीच्या माध्यमातुन लक्ष ठेवत आहेत. यावर्षी यात्रेतील दुकाने, खेळणी ही गर्दी पासुन लांब असल्यामुळे यात्रेतील सुखकर अनुभव भावीक घेत आहेत.

Web Title: celebrating yatra of nagnath