हजरत पीर वो गैब मर्दान(रह.) यांचा सोमवारपासून पासून उरुस

dargah
dargah

ब्रह्मपुरी (सोलापूर) : संतांची भुमी म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेल्या हिंदु- मुस्लिम ऐक्याचे प्रतिक व मंगळवेढयाचे ग्रामदैवत हजरत पीर वो गैब मर्दान (रह.) उरुसाला सोमवार पासून (ता.१६) सुरुवात होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या उरुसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती उरुस समितीचे प्रमुख चंद्रकांत पड़वळे यांनी दिली.

संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श घालून देणारे धार्मिक सण आणि उत्सव मंगळवेढ्यात साजरे केले जातात.हिंदू सणाचे प्रमुख मुस्लिम आणि मुस्लिम सणाचे प्रमुख हिंदू असे आदर्श घालून देणारे सण मंगळवेढ्यात होत असल्याने ही पध्दत जातीयवाद्याला मुठमाती घालणारी आहे.                                

उरुसाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (ता.१६) सायंकाळी सात वाजता कळसाची भव्य मिवणुक काढली जाईल.दरवर्षी प्रमाणे हिजरी सन  रज्जब २९  या दिवशी कळसाची मिरवणूक झाल्यानंतर रात्री देवाचा गंध ,फातेहखानी,फुले व चादर      चढविण्याचा कार्यक्रम मौलाना कारी सलीम नवाजी व हसन सय्यद जावेद पाशा यांच्या हस्ते तर ,लक्ष्मण ढोबळे,प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड़,तहसिलदार अप्पासाहेब समिंदर ,उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाले,मुख्याधिकारी डाॅ नीलेश देशमुख,पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे ,मानकरी अनिल पाटील यांच्या उपस्थितीत व चंद्रकांत पडवळे अध्यक्ष असतील.          

उरुसाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी  (ता.१७) पहाटे तीन वाजता नटुलाल दारुवाले यांच्या नयनरम्य आतिशबाजी शोभेच्या दारुकाम उद्घाटन विष्णुपंत आवताड़े यांच्या हस्ते होईल. सकाळी नऊ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाईल.सायंकाळी सहा वाजता "माँ का आँचल "फेम जंगी कव्वाली चा कार्यक्रम होईल याचे उदघाटन आमदार प्रशांत परिचारक यांच्याहस्ते  फैबटेक शुगर अध्यक्ष भाऊसाहेब रूपनर , बाबुभाई मकानदार,नगराध्यक्षा अरुणा माळी  यांच्या उपस्थितीत होईल. बुधवारी (ता.१८) दुपारी चार वाजता दर्ग्याच्या प्रांगणात जंगी  कुस्त्याच्या फड भरविण्यात येणार आहे याचे उद्घाटन दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताड़े यांच्या हस्ते होईल.अध्यक्षस्थानी भैरवनाथ साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल सावंत राहणार आहेत.

रात्री आठ वाजता महागायक मोहम्मद अयाज यांच्या हिंदी मराठी सदाबहार गितांचा स्वर जल्लोष कार्यक्रमाचे उदघाटन आजाद पटेल अध्यक्ष फिरोज मुलाणी असतील.गुरुवार (ता.१९)दुपारी चार वाजता कुस्ती स्पर्धा होईल याचे उदघाटन आमदार भारत भालके यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी राहुल शहा राहणार आहेत. रात्री आठ वाजता स्वरसंध्या जुन्या मराठी हिंदी गायनाचे कार्यक्रमाचे उद्घाटन सुजीत कदम तर उद्योजक चेतन गाडवे अध्यक्ष असतील .शुक्रवार ( ता.२०)सकाळी आठ वाजता कुरआनखानी(लंगरखाना)महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.  भाविकानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहान उरुस समिती केले आहे.              

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com