संगमनेरात जल्लोष 

आनंद गायकवाड 
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांची राज्यातील महत्त्वाच्या महसूल, ऊर्जा व शालेय शिक्षण खात्याच्या मंत्रिपदी निवड झाल्याचा आनंद कार्यकर्ते व नागरिकांनी संगमनेरात फटाक्‍यांची आतषबाजी करून साजरा केला. 

संगमनेर : महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांची राज्यातील महत्त्वाच्या महसूल, ऊर्जा व शालेय शिक्षण खात्याच्या मंत्रिपदी निवड झाल्याचा आनंद कार्यकर्ते व नागरिकांनी संगमनेरात फटाक्‍यांची आतषबाजी करून साजरा केला. 

 

संगमनेर : राज्याच्या महसूल व ऊर्जामंत्रिपदी बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याबद्दल यशोधन कार्यालयासमोर फटाक्‍यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद 
यापूर्वी बाळासाहेब थोरात यांनी महसूल खात्याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळताना या खात्याला हायटेक, लोकाभिमुख व गतिमान केले होते. ऑनलाइन सात-बारा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह पारदर्शी व चांगल्या कामामुळे या विभागाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे पुन्हा महसूल खात्याची जबाबदारी दिली आहे. त्याबरोबरच ऊर्जा व शालेय शिक्षण, पशुवैद्यकीय या खात्यांची जबाबदारीही थोरात यांच्याकडे असणार आहे. 
 

हेही वाचा डरकाळी ऐकली नि अंगात कापरे भरले 

गुलालाची उधळण 
कॉंग्रेसच्या अडचणीच्या काळामध्ये पक्षाला ऊर्जितावस्था देणाऱ्या थोरात यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांचा शेतकऱ्यांचे नेते असा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. या नव्या जबाबदारीमुळे त्यांच्याकडून राज्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अनेक दिवस लांबलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर आज शिक्कामोर्तब होताच, संगमनेरात सर्वत्र जल्लोष करण्यात आला. अमृतनगर, यशोधन कार्यालय, थोरात यांचे निवासस्थान, तसेच नवीन नगर रोड, सय्यद बाबा चौक अशा विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी केली. तालुक्‍यातील त्यांच्या अधिपत्याखालील गावांमध्येही गुलालाची उधळण झाली. 

हेही वाचा (व्हिडीओ) खड्डयांच्या निषेधाचा रॅपचिक फंडा 

या वेळी इंद्रजित थोरात, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष बाबा ओहोळ, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आनंदा वर्पे, उपाध्यक्ष सुभाष सांगळे, भास्कर पानसरे, नामदेव कहांडळ, मच्छिंद्र गुंजाळ, विशाल काळे, अभिजित बेंद्रे, महेश वाव्हळ, जालिंदर धोक्रट, तात्यासाहेब कुटे, दत्तू कोकणे, समीर कडलग, अजित सरोदे, लक्ष्मण गोर्डे, बाळासाहेब हांडे आदींसह तालुक्‍यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आवश्‍यक वाचा निम्म्या पंचायत समित्यांमध्ये महिलाराज 

संगमनेर जिल्हा कृती समितीच्या आशा पल्लवीत 
यापूर्वीच्या महसूल मंत्रिपदाच्या कार्यकाळात बाळासाहेब थोरात यांनी पालघर जिल्ह्याची निर्मिती केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून नगर जिल्हा विभाजनाच्या प्रलंबित प्रश्‍नावर मार्ग काढताना संगमनेर जिल्हा होण्याच्या संगमनेर जिल्हा कृती समितीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The celebrations of people at Sangamner