सेलिब्रिटी मतदानासाठी आले कोल्हापुरात...!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

कोल्हापूर - विविध दूरचित्रवाणी मालिका, चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या कलाकारांनी सकाळीच कोल्हापूर गाठले. सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावून रात्री पुन्हा ते मुंबईला परत गेले. लोकशाहीत मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावायला हवा आणि आम्ही तर त्यात आघाडीवरच असले पाहिजे, अशा भावना त्यांनी या वेळी व्यक्त केल्या. 

अभिनेता आनंद काळे सध्या मुंबईत ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यांनी पत्नी राधिका यांच्याबरोबर शिवाजी पार्कातील विक्रम हायस्कूल येथील केंद्रावर मतदान केले. संगीतकार शशांक पोवार यांनी सहकुटुंब विद्यापीठ हायस्कूल येथील केंद्रावर मतदान केले. अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी नागोजीराव पाटणकर हायस्कूल येथील मतदान केंद्रात सहकुटुंब मतदान केले. 

दरम्यान, सध्या कोल्हापूर शहर परिसरात दोन मालिकांचे शूटिंग सुरू असून सांगलीत एका मालिकेसाठी सुरू असलेल्या शूटिंगमध्येही कोल्हापुरातील कलाकार व तंत्रज्ञांची संख्या मोठी आहे. त्यांनीही आज मतदान करूनच शूटिंगला जाणे पसंत केले. साहजिकच या ठिकाणी दुपारी दोननंतरच शूटिंगचे शेड्यूल राहिले.

Web Title: Celebrity came to Kolhapur for voting