"सीना'चे प्रथमच धरणावर नियोजन

"Cena's planning on the dam for the first time."
"Cena's planning on the dam for the first time."

कर्जत (नगर) ः कुकडी कालवा असो, नाही तर सीना धरणातील आवर्तन असो. त्याचे नियोजन पुण्यातील बैठकीत व्हायचे. ते कधी येईल, याचीही लाभधारक शेतकऱ्यांना माहिती नसायची. एकीकडे जास्त, तर दुसरीकडे ठणठणाट. टेलला तर ती कायमच बोंब असायची. चाऱ्या दुरुस्त करायच्या त्याही शेतकऱ्यांनी. याविरुद्ध आवाज उठवला, तर गुन्हे दाखल व्हायचे. हे दुष्टचक्र आमदार रोहित पवार यांनी भेदले. शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकाऱ्यांना आणून त्याचे नियोजन केले. या अभिनव उपक्रमाने कर्जतकर शेतकरी भारावून गेलेत. 

सीना धरणाच्या नियोजनाची बैठक आज मिरजगावात पार पडली. त्या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून नियोजन करण्यात आले. या वेळी गुलाब तनपुरे, ऍड. कैलास शेवाळे, प्रवीण घुले, किरण पाटील, परमवीर पांडुळे, एकनाथ खेतमाळीस, नितीन खेतमाळीस, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हनुमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, उपविभागीय अधिकारी बाजीराव थोरात यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जानेवारी आणि एप्रिल महिन्यात सीना धरणातून टेल तू हेड आवर्तन सोडण्यात येईल. सीना कालव्यातील चाऱ्या, पोटचाऱ्यांची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. त्या दुरुस्त करण्यासाठी लोकवर्गणीमधून, सकाळ रिलीफ फंडातून पंधरा लाख रुपये इंधन खर्च दिला जाईल. मी पवार साहेबांचा नातू आहे. अभ्यास आणि गृहपाठ पूर्ण करूनच बैठकीला येतो. आपली सर्व स्वप्न पूर्ण होतील, अशी ग्वाही आमदार पवार यांनी दिली. 
शेवाळे म्हणाले, की सीना परिसर समृद्ध व्हावा, यासाठी तत्कालीन पाटबंधारेमंत्री कै. आबासाहेब निंबाळकर यांनी सीना धरणाची निर्मिती केली. मात्र, सध्या लाभक्षेत्रातील शेती व शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. भोसे खिंड ते सीनाचा मुख्य कालवा जोडल्यास समृद्धी येईल. 

या वेळी तनपुरे, प्रा. किरण पाटील, बाळासाहेब सपकाळ, पोपट खोसे, अभंग बोरुडे, गंगाधर बोरुडे, प्रल्हाद गुंजाळ, आजिनाथ म्हेत्रे आदींनी चाऱ्यांविषयी माहिती दिली. 
या वेळी प्रवीण घुले, रघुनाथ काळदाते, प्रल्हाद गुंजाळ यांनी गाळ उपशासाठी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. मिरजगाव ग्रामपंचायतीने मोफत यंत्र दिले. प्रास्ताविक रघुनाथ काळदाते यांनी केले. सूत्रसंचालन तान्हाजी पिसे यांनी केले. 

कर्जत ब्लॅक लिस्टमधून जाईल 

अधिकारी कर्जतला यायला तयार नसायचे. गडचिरोलीला जाऊ; मात्र कर्जत नको म्हणायचे. आता मानसिकता बदलत आहे. शासकीय यंत्रणा सकारात्मक आहे. सर्वांच्या समन्वयातून कर्जत-जामखेड मॉडेल करायचा आहे, असेही आमदार पवार म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com