झरेत केंद्रस्तरीय इंग्रजी भाषा समृद्धी कार्यक्रम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

इंग्रजी भाषा समृद्धी कार्यक्रमांर्गत पंचक्रोशी जनता विद्यालयात पाचवी-सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा उत्साहात झाली.

झरे - येथील पंचक्रोशी विद्यालयात केंद्रस्तरीय इंग्रजी भाषा समृद्धी कार्यक्रम झाला. जि. प. च्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने सुरू असलेल्या इंग्रजी भाषा समृद्धी कार्यक्रमांर्गत पंचक्रोशी जनता विद्यालयात पाचवी-सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा उत्साहात झाली. पंचक्रोशी जनता विद्यालय, जवाहरलाल नेहरू विद्यालय (झरे), विभूतवाडी हायस्कूल (विभूतवाडी), जि. प. प्राथमिक शाळा (झरे) व जि. प. प्राथमिक शाळा (पिंपरी) शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 

मुख्याध्यापक श्री. घोणते, विभूतवाडी हायस्कूलचे जाधव, काळेल, जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे सोनवणे, झरे जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पावणे व पिंपरी जि. प. प्राथमिक शाळेचे राठोड उपस्थित होते. प्रविण पारसे यांनी सूत्रसंचालन केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Center level English Language Prosperity Program in Zure