गर्भलिंग निदान करणाऱ्या सेंटरवर सोलापुरात छापा 

गर्भलिंग निदान करणाऱ्या सेंटरवर सोलापुरात छापा 

मोहोळ (जि. सोलापूर) - पंढरपूर रस्त्यावरील विहान हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान चाचणीबाबत सोनोग्राफी करणाऱ्या डॉ. सत्यजित मस्के व अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे व फसवणुकीचाही गुन्हा दाखल केला आहे. 

मोहोळ येथे माया अष्टुळ नावाची महिला गर्भलिंग निदान चाचणी करण्याचे काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदुरकर यांनी तज्ज्ञांचे एक पथक तयार करून एका डमी गर्भवती महिलेच्या साह्याने माया अष्टुळ हिच्याकडे संपर्क केला. माया हिने संबंधित गर्भवती महिलेस मोहोळ येथील बसस्थानकावर बोलावून घेत नेहमीचा रिक्षावाला अप्पा गणेश आदलिंगे याच्याबरोबर मोहोळ येथील विहान हॉस्पिटलमध्ये आणले. मध्यस्थी करणाऱ्या महिलेने गर्भवती महिलेस तत्काळ गर्भलिंग निदान विभागात नेले. गर्भवती महिलेला स्वत:साठी बक्षीस आणि डॉक्‍टरची फी असे 14 हजार खर्च सांगण्यात आला. मस्के यांनी संबंधित गर्भवती महिलेची लिंगनिदान चाचणी करताच बाहेर दबा धरून बसलेल्या वैद्यकीय पथकाने छापा टाकला. कारवाई झाल्याचे लक्षात येताच डॉ. मस्के यांच्यासह संबंधित माया यांनी "आम्ही आत्महत्या करू, इथे काहीच घडलेले नाही' असा कांगावा करत आरडाओरडा करून पथकाला शासकीय काम करताना अडथळा निर्माण केला. या संशयित आरोपींना मोहोळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com