‘धूम स्टाइल’ने पुन्हा चेन स्नॅचिंगचा सपाटा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

सांगली - विश्रामबाग पोलिस ठाणे हद्दीत आठवड्यात चेन स्नॅचिंगच्या दोन घटना घडल्या. गावभागातही एक प्रकार घडला. विश्रामबागला पोलिसांनी मुंबई-पुणे स्टाइलने सकाळी गस्त घालून पाहिली; परंतु थांबून-थांबून चेन स्नॅचिंगचे प्रकार घडतात. निर्मनुष्य रस्त्यावर अगदी सहजपणे चोरटे महिलांच्या गळ्यातील गंठण, मंगळसूत्र किंवा सोनसाखळी हिसडा मारून  लंपास करतात. पोलिसांच्या गस्तीची मात्रा चोरट्यांना लागू होत नाही.

सांगली - विश्रामबाग पोलिस ठाणे हद्दीत आठवड्यात चेन स्नॅचिंगच्या दोन घटना घडल्या. गावभागातही एक प्रकार घडला. विश्रामबागला पोलिसांनी मुंबई-पुणे स्टाइलने सकाळी गस्त घालून पाहिली; परंतु थांबून-थांबून चेन स्नॅचिंगचे प्रकार घडतात. निर्मनुष्य रस्त्यावर अगदी सहजपणे चोरटे महिलांच्या गळ्यातील गंठण, मंगळसूत्र किंवा सोनसाखळी हिसडा मारून  लंपास करतात. पोलिसांच्या गस्तीची मात्रा चोरट्यांना लागू होत नाही.

त्यामुळे काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच महिलांनीदेखील दागिन्यांबाबत दक्षता बाळगणे आवश्‍यक वाटू लागले आहे.
आठवड्यापूर्वी चोरट्यांनी चक्क गजबजलेल्या  गावभागात स्मिता पावसकर यांचे ६० हजार रुपयांचे गंठण चोरट्याने हिसडा मारून लंपास केले. चार दिवसांपूर्वी शंभरफुटी रस्त्यावर चेतना पेट्रोल पंपासमोर दीड तोळ्याचे गंठण हिसडा मारून लांबवले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी विश्रामबाग येथील खुले नाट्यगृहाजवळ चक्क मोपेडवरून आलेल्या एकट्या चोरट्याने महिलेची दीड तोळ्याची सोनसाखळी लंपास केली. विश्रामबाग हद्दीत चेन स्नॅचिंगच्या अनेक घटना  घडल्या आहेत. चोरटे थांबून-थांबून चोऱ्यांचे धाडस करत आहेत असे दिसते.

गतवर्षी चेन स्नॅचिंगचे प्रकार सकाळी घडल्याचे पाहून पोलिसांनी मुंबई आणि पुणे पोलिसांप्रमाणे चक्क सकाळीच गस्त सुरू केली. सकाळी सहापासून गस्त घालताना पोलिस दिसले. गस्त सुरू असताना देखील चोरीचे प्रकार घडले. सकाळची गस्त आता शिथिल  झाली आहे. तसेच संध्याकाळचे पेट्रोलिंगही फारसे प्रभावी नाही की काय? अशी परिस्थिती आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आठवड्यात सांगलीत चेन स्नॅचिंगचे तीन प्रकार घडले. सुमारे सव्वा लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी काही सेकंदात लुटले.

एकटी महिला पाहून दुचाकीवरून मागून यायचे. अवघ्या दोन सेकंदात दागिना हिसडा मारून तोडल्यानंतर ‘धूम स्टाईल’ ने पसार व्हायचे अशी चोरट्यांची पद्धत आहे. पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल होताना अज्ञात काळ्या रंगाच्या वाहनावरून दोघा अज्ञातानी दागिने लंपास केल्याची नोंद होते. त्यावर पोलिसांना तपास करणेही कठीण बनते. त्यामुळे पूर्वीच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी किंवा अन्य माहिती मिळाली तरच तपास पूर्ण होतो.
 

सीसीटीव्ही कॅमेरे बंद
चोरटे शेजारील जिल्ह्यातून येऊन चोरी करून पळून जातात असे साधारण चित्र दिसते. परंतु सांगलीत  येणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे चोरटे त्यामध्ये कैद होऊ शकत नाहीत.

दक्षता आवश्‍यक
सकाळी किंवा सायंकाळी फिरायला जाताना महिलांनी दागिने एकतर घरात सुरक्षित ठेवून जावे किंवा दागिने कोणाला दिसणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे.

Web Title: chain snaching to dhoom style