चेन स्नॅचिंग करणारी वाळवा तालुक्यातील टोळी गजाआड 

चेन स्नॅचिंग करणारी वाळवा तालुक्यातील टोळी गजाआड 

कोल्हापूर - महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसडा मारून लंपास करणारी वाळवा तालुक्‍यातील तिघा जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. शहरासह, शाहूवाडी, जयसिंगपूर अशा विविध ठिकाणी 27 गुन्हे या टोळीकडून उघड झाले. यात दोन घरफोड्यांचाही समावेश आहे. त्या तिघांकडून 60 तोळे सोन्याच्या दागिन्यासह दोन मोटारायकली असा सुमारे 19 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अटक केलेल्या संशयितांची नांवे - निकेश ऊर्फ बबलू नारायण वडार (वय 23, रा. माळभाग नेर्ले, ता. वाळवा), सचिन श्रीकांत हिंगणे (वय 29, रा. बाबंवडे, ता. वाळवा) आणि सुनील मोहन रनखांबे (वय 22, रा. नेर्ले ता. वाळवा) अशी आहेत. 

शहरासह जिल्ह्यात चेन स्नॅचिंगचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून याचा तपास सुरू होता. पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष माने यांना चेन स्नॅचिंगचे प्रकार संशयित निकेश ऊर्फ बबू वडार साथिदाराच्या मदतीने करत आहे. तो मध्यवर्ती बसस्थानक येथील एका हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दादाराजे पवार यांचे एक पथक तयार करण्यात आले.

या पथकाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सापळा रचला. तेथून संशयित 21 जूनला सायंकाळी संशयित निकेश ऊर्फ बबलू वडारला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पायी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून चोरल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यात त्याने संशयित सचिन हिंगणे व सुनील रनखांबे या दोघांच्या मदतीने 12 गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना अटक अटक केली. त्यांच्याकडून आणखी 13 गुन्ह्यांची उकल झाली. त्या तिघांकडून चोरीतील 18 लाख रूपये किमंतीचे 60 तोळे सोन्याचे दागिने आणि दोन मोटारसायकली जप्त केले.

ही कारवाई उपनिरीक्षक पवार, कर्मचारी संतोष माने, कृष्णांत पिंगळे, नामदेव यादव, सोमराज पाटील, संजय पडवळ, संतोष पाटील, प्रल्हाद देसाई, संजय चाचे, सचिन देसाई यांनी केली. 

27 गुन्हे उघड... 
तिघा संशयितांकडून 2018 मधील 12 व 2019 मधील 13 व घरफोडीचे दोन अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. यात शाहपुरी पोलिस ठाण्याचे 6, राजारामपुरी 3, जुना राजवाजा 2, वडगाव 4, करवीर 3, शाहूवाडी 5, जयसिंगपूर 2, शिरोळ 1, कोडोली 1 अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. 

सोने विक्रीची जबाबदारी सुनीलवर... 
चोरीचे सोने सोनारांना विण्याची जबाबदारी संशयित सुनील रनखांबेवर होती. तो संबधित सोन्याची विक्री करून मिळालेले पैशाची वाटणी करत होता. चोरीचे सोने संबधित सराफाकडून जप्त करण्यात आले असून त्यांना या प्रकरणात साक्षीदार करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

गुन्हे उघड झालेले फिर्यादी कंसात पोलिस ठाणे 
सीमा शेट्टी, जयश्री बिराजदार, राजश्री पाटील, शोभा सुतार, अमृता मुंगळे (शाहूपुरी), सुजाता पाटील, शोभा कोरवी, पल्लवी परब, पल्लवी बुकशेट, (वडगाव), शर्मिष्ठा नलवडे, विमल सईबन्नावार, प्रतिमा गांधी (राजारामपुरी), रुक्‍मिणी ढाले, कुसूम राजुरीकर (जुना राजवाडा), सुलभा खलप, अलका उत्तुरे, रेश्‍मा घाडगे (करवीर), शहाजी रोहिदास (कोडोली), सखुबाई खडके (शिरोळ), सुरेखा मतके, राजश्री शंभुशेटे (जयसिंगपूर), बयाबाई पाटणे, प्रियंका केसरकर, सविता शिंदे, वसंत हावळे, वसंतकुमार मानानी (शाहूवाडी) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com