शुल्कवाढीविरोधात मंगळवारी कऱ्हाडला चक्का जाम आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

कऱ्हाड - केंद्र व राज्य शासनाने रिक्षा व अन्य वाहनांच्या परिवहन विभागाकडील शुल्कात केलेल्या वाढीविरोधात राज्य कृती समितीने मंगळवारी (ता. 31) पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनासाठी शंभर टक्के रिक्षा बंद ठेवण्याचा निर्धार आज येथे कऱ्हाड तालुका रिक्षाचालक- मालक संयुक्त कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर समितीचे अध्यक्ष अशोकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रिक्षाचालक- मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी मकसूद बागवान, मुसा शेख, रमजान कागदी, वसंत देवाडिगा, सुनील पाटील, विजय माने, संजय बांदल आदी उपस्थित होते. सोमवारी (ता. 30) रात्री बारा वाजल्यापासून मंगळवारी रात्री बारापर्यंत या आंदोलनासाठी रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सकाळी अकरा वाजता सर्व रिक्षाचालक- मालकांनी येथील कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यानजीक एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य कृती समितीचे अध्यक्ष बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीत मंगळवारी राज्यभर चक्का जाम करण्याच्यादृष्टीने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापार्श्‍वभूमीवर येथील कृती समितीने एकत्र येऊन त्याबाबत निर्णय घेतला. दरम्यान, रिक्षासह जीप, टेंपो, स्कूलबस आदी वाहनेही या आंदोलनात सहभागी होण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

Web Title: chakka jam agitation for rto fee increase