मराठा आरक्षणासाठी कोंडीला चक्काजाम; गुन्हे मागे घेण्यासाठी नेत्यांचे पोलिसांना निवेदन 

प्रमोद बोडके
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

कोंडी येथे सकाळी अकरा वाजता आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या मारला. यावेळी सरकार विरोधी घोषणा देत आरक्षणचा नारा दिला.

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उत्तर सोलापूर तालुक्‍याच्यावतीने आज सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडील येथे रास्तारोको करून चक्काजाम करण्यात आला. महामार्गावर ठिय्या मारत आंदोलनकर्त्यांनी वाहतूक रोखून धरली. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ बंद पडली. 

कोंडी येथे सकाळी अकरा वाजता आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या मारला. यावेळी सरकार विरोधी घोषणा देत आरक्षणचा नारा दिला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ राऊत, शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रताप चव्हाण, नाना म्हस्के, विक्रांत काकडे, भरत पाटील, शहाजी भोसले, बाबा नीळ, ज्ञानेश्वर मोरे, संजय पवार, प्रसाद नीळ, राष्ट्रवादीचे गणेश पाटील, वामन भोसले, नागेश नीळ यांच्यासह तालुक्‍यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. 

आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी सोलापूर बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये सहभागी झालेल्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे यासाठी सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज सोलापूरचे पोलिस आयुक्त तांबडे यांची भेट घेतली. लोकशाही पद्धतीने केलेल्या विविध प्रकारच्या आंदोलनात जे मराठा समाजातील मुलांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत ते सरसकटपणे परत घ्यावे ही मागणी करण्यात आली. 

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी उपमहापौर नानासाहेब काळे, माजी परिवहन सभापती राजन भाऊ जाधव, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष संतोष पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत वानकर, नगरसेवक गणेश दादा वानकर, धर्मा बाटलीवाला, सोलापूर जिल्हा समन्वयक माऊली पवार, रवी मोहिते, प्रमोद भोसले, सुहास कदम, प्रकाश डांगे, राज पांढरे व समाज बांधव उपस्थित होते. 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Chakkajam at Kondi for Maratha reservation