डोक्‍याला शॉट नको.. संगमनेरात चला, हवा येऊ द्या 

chala hawa yeu dhya in sangamner
chala hawa yeu dhya in sangamner

संगमनेर : संगमनेरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मेधा महोत्सवाची "हवा' आहे. या महोत्सवात राजकीय तसेच फिल्म जगतातील दिग्गजांनी हजेरी लावल्याने ती राज्यस्तरापर्यंत पोहचली आहे. मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार यांच्यापासून ते धीरज देशमुख, आदिती तटकरे, झिशान सिद्धीकीपर्यंतची नवखी राजकीय मंडळी आल्याने संगमनेरकरांची चांगलीच हवा झाला. काल रात्री चला, हवा येऊ द्या फेम कलाकारांनी हास्यातून धुमाकूळ घातला. या वातावरणामुळे संगमनेरकरांची म्हणजेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची "हवा' झाली. 

रोज घरातील टीव्हीवरील विविध वाहिन्यांच्या कार्यक्रमात विनोदाची खैरात करणाऱ्या दिग्गजांना प्रत्यक्ष व्यासपीठावर पाहण्याची, त्यांच्या विनोदी प्रसंगाचा आनंद घेण्याची संधी संगमनेरकर रसिकांना लाभली. राज्याचे आघाडीचे विनोदवीर भाऊ कदम व कुशल बद्रिके यांच्या गावगाडा या बतावणीने "अमृतवाहिनी'च्या मेधा उत्सवात धमाल केली. 

भाऊ कदम, कुशल भद्रिकेंची हास्य जत्रा 
विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक महोत्सवात विविध कलावंतांची हजेरी ही मेधा महोत्सवाची खासियत आहे. काल रात्री रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात बालकलाकार ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सादरीकरणादरम्यान गायिका कार्तिकी गायकवाड, प्रसन्नजित कोसंबी, अभिनेता पुष्कर जोग, सायली पराडकर यांच्यासह भाऊ कदम व कुशल बद्रिके या जोडगोळीने प्रेक्षकांना जिंकले. 

तांडव, भांगडा 
विविध कार्यक्रमांसह तांडव, भांगडा, समूहनृत्याबरोबरच चिमुकल्यांचा फॅशन शो उपस्थितांना भावला. मुलींची सुरक्षितता या विषयावरील गीताने प्रेक्षक हेलावले. भव्य व्यासपीठाला साजेशी नेपथ्य व ध्वनी, प्रकाश व्यवस्था, बैठक व मोठ्या एलसीडी स्क्रिनमुळे हा कार्यक्रम दर्जेदार ठरला. 

विद्यार्थ्यांसाठी व्यासपाठी - थोरात 
मंत्री थोरात म्हणाले, की या लोकप्रिय महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून, त्यांच्यासाठी हे मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे. मात्र, मनोरंजनाबरोबरच आपल्या करियरकडेही गांभीर्याने पाहण्याची आवश्‍यकता असून, अभ्यासाला पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


कांचन थोरात, शरयू देशमुख, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, कला दिग्दर्शक राकेश हांडे, भाऊसाहेब गायकवाड, रामहरी कातोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षक उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com