महाराष्ट्र सरकारचे सहकारी दूध संघांना आव्हान 

तात्या लांडगे 
रविवार, 10 जून 2018

अतिरिक्‍त दूध शासनाने हमीभावाने खरेदी करावे, अन्यथा संकलन बंद करु असा इशारा सहकारी दूध संघांनी यापूर्वी दिला. त्यामुळे राज्य सरकार आता महाराष्ट्रातील दूध संकलनाकरिता गुजरातच्या अमूल सहकारी दूध संघाचा पर्याय शोधत राज्यातील सहकारी दूध संघांना सरकारने आव्हानच दिल्याचे विश्‍वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्यात एकूण सव्वा कोटी लीटर दूधाचे संकलन होते.

सोलापूर : अतिरिक्‍त दूध शासनाने हमीभावाने खरेदी करावे, अन्यथा संकलन बंद करु असा इशारा सहकारी दूध संघांनी यापूर्वी दिला. त्यामुळे राज्य सरकार आता महाराष्ट्रातील दूध संकलनाकरिता गुजरातच्या अमूल सहकारी दूध संघाचा पर्याय शोधत राज्यातील सहकारी दूध संघांना सरकारने आव्हानच दिल्याचे विश्‍वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्यात एकूण सव्वा कोटी लीटर दूधाचे संकलन होते.

त्यापैकी बहुतांशी दूध पॅकिंगद्वारे तर काही दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी वापरले जाते. तरीही सुमारे 53 लाख लीटर दूध शिल्लक राहतेच. महाराष्ट्रातील सहकारी दूध संघाच्या ताठर भुमिकेवर सरकारने गुजरातच्या अमूलला दूध संकलनाची तात्पुरती परवानगी दिली. सध्या राज्यातील हजारो लीटर दूध अमूल खरेदी करते. देशपातळीवरील या दूध संघाने गुजरातमध्ये सर्वात मोठी दूध महापूर योजना राबविली आहे.

सहकारी संघांनी अचानकपणे दूध संकलन बंद केले तर त्याला पर्याय उपलब्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्वात मोठी यंत्रणा असलेल्या या संघाकडे महाराष्ट्रातील संपूर्ण दूध संकलित करण्याची क्षमता आहे. सध्या राज्यात 70 सहकारी दूध संघ आहेत. एकूण संकलनाच्या 60 टक्‍के दूध सहकारी संघ व 39 टक्‍के दूध खासगी संघातर्फे आणि एक टक्‍का दूध शासन खरेदी करते. 
सुनील शिरापूरकर, विभागीय उपनिबंधक, दुग्ध

आकडे बोलतात..

राज्याचे दूध संकलन 
1,21,62000 लीटर 
खासगी संघाचे संकलन 
72.50 लाख लीटर 
सहकारी दूध संघांचे संकलन 
47.61 लाख लीटर 
शासनातर्फे दूध संकलन 
1.51 लाख लीटर

Web Title: Challenge the Maharashtra government's co-operative milk teams