ढासळलेला बुरूज सावरण्याचे नवीन पदाधिकाऱ्यांसमोर आव्हान

हुकूम मुलाणी
गुरुवार, 12 जुलै 2018

मंगळवेढा - सध्या निवडणूका नसल्या तरी आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणूकीचा विचार करता राष्ट्रवादीचा ढासळलेला बुरूज पुन्हा उभारण्यासाठी मंगळवेढ्यात पदाधिकारी बदलण्यात आले. पण विस्कटलेल्या राष्ट्रवादीची घडी बसविण्याचे आव्हान नवीन पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या शहर व तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जिल्हाध्यक्ष दिपक आबा साळुंके पाटील यांनी जाहीर केल्या निवडी करताना जातीय समतोल ठेवण्यात यश आले.

शहर व तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना पक्षाला अलिकडच्या काळात घरघर लागली. नगरपालिकेत नेते राहुल शहा यांच्यामुळे आ. भालके गटाशी युती करत राष्ट्रवादी सत्तेपर्यंत आली. तालुक्याच्या ग्रामीण भागात मात्र राष्ट्रवादीला स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायती निवडणुकीतही  अपेक्षित यश मिळवता आले नसल्यामुळे तालुका राष्ट्रवादीची भाकरी फिरवण्याची गरज असल्याची ओरड झाल्याने भाकरी फिरवण्यात आली.

त्यामध्ये शहराध्यक्ष म्हणून पक्षनेते अजित जगताप यांनी संधी दिली राष्ट्रवादीचे नेते राहुल शहा यांचे समर्थक असलेल्या जगताप यांचा शहरात चांगला जनसंपर्क आणि युवा चेहरा म्हणून ख्याती तर तालुकाध्यक्ष म्हणून सुनिल डोके हे माध्यमिक शिक्षक असून पुर्व व दक्षिण भागात चांगला समर्क आहे. याशिवाय लतीफ तांबोळी, भारत बेदरे, भारत पाटील, काशीनाथ पाटील, पी.बी.पाटील, सोमनाथ माळी यांना जिल्हयाच्या बॉडीत संधी देवून उत्तम प्रकारे जातीय समतोल साधला असला तरी 2009 पासून दुरावलेला मतदार पुन्हा राष्ट्रवादीकडे आकर्षित करताना गाव तिथे शाखा सुरू करुन सध्या निवडणूका नसल्या तरी आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणूकीचा विचार करता आतापासूनच तयारी करावी लागणार आहे.

Web Title: Challenge to the new office-bearers to reclaim an undeveloped bastion