सीमाप्रश्‍नी वास्तव मांडण्यासाठी प्रयत्नशील 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात वास्तव मांडण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असे आश्‍वासन पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज महाराष्ट्र एकीकरण समितीला दिले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज पालकमंत्र्यांची शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली. त्या वेळी पालकमंत्र्यांनी हे आश्‍वासन दिले. 

सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडत असताना येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात आणखीन एक वकील देण्याचे काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी पालकमंत्र्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी 10 मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीच्या वेळीही न्यायालयात वास्तव मांडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला कळवावे, असे एकीकरण समितीतर्फे सांगण्यात आले. या वेळी पालकमंत्री पाटील यांनी या कामी लागेल ते सहकार्य राज्य शासन करेल, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही याबाबत चर्चा केली जाईल, असे सांगितले. 

या वेळी आमदार अरविंद पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव मालोजी अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणीकर, आमदार दिगंबर पाटील, लिंगोजी हुद्दार, राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे, जयराम मिरजकर, दिनेश ओहूळकर आदी उपस्थित होते.

Web Title: Chandrakant Patil assured the Committee for Unification of Maharashtra