विधानसभेला सांगली जिल्हा काँग्रेसमुक्त करू - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सांगली - दिवंगत आर. आर. पाटील यांचे तासगाव, डॉ. पतंगराव कदम यांचे कडेगाव, जयंत पाटील यांचे इस्लामपूर यापूर्वी जिंकले. वसंतदादांचे वारसदार असलेल्या प्रतीक व विशाल पाटील यांची सांगली महापालिका जिंकली. आता विधानसभा निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमुक्त करू, असा विश्‍वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

सांगली - दिवंगत आर. आर. पाटील यांचे तासगाव, डॉ. पतंगराव कदम यांचे कडेगाव, जयंत पाटील यांचे इस्लामपूर यापूर्वी जिंकले. वसंतदादांचे वारसदार असलेल्या प्रतीक व विशाल पाटील यांची सांगली महापालिका जिंकली. आता विधानसभा निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमुक्त करू, असा विश्‍वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर आज कर्नाळ रस्त्यावरील धनंजय गार्डनमध्ये भाजपचा विजयी मेळावा आणि नूतन नगरसेवकांचा सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

मार्केट कमिटी, बॅंक बाकी
श्री. खाडे म्हणाले, ‘‘आता मार्केट कमिटी व जिल्हा बॅंक बाकी आहे. भाजपचा झेंडा तिथेही फडकवू. काँग्रेस उमेदवारांना गुलाल लागणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.’’

त्यांची डोकी बिघडली
श्री. हाळवणकर म्हणाले, ‘‘काँग्रेस-राष्ट्रवादीला निकाल जिव्हारी लागला. जयंत पाटील तुम्ही जिंकला की तो विजय आणि आम्ही जिंकलो की गडबड हे बंद करा. त्यांची डोकी बिघडलीत. बदनामीसाठी विविध मार्गाचा अवलंब ते करत आहेत.’’

आमदार सुरेश हाळवणकर, प्रदेश संघटक रघुनाथ कुलकर्णी, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘‘सांगली महापालिकेत भाजपने घडवलेले परिवर्तन मोठे आहे. दिल्लीनेही त्याची दखल घेतली. निवडणुकीपूर्वी भाजपचे काही खरे नाही, जनता कंटाळली, असे चित्र विरोधकांनी निर्माण केले होते. परंतु त्याला मतदारांनी तडा दिला. मतदानाच्या पूर्वसंध्येला एका मुलाखतीत मी छातीठोकपणे भाजपची सत्ता येणार, असे वक्तव्य केले होते. नागरिकांनी आमच्या कामांवर विश्‍वास ठेवून मतदान केले. इथला उद्योग, व्यापार वाढवून विकास केला जाईल. समृद्ध सांगलीचे चित्र दिसेल.’’

ते म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत खासदार संजय पाटील पुन्हा निवडून येतील. विधानसभेच्या आठपैकी आठ जागांवर विजय मिळवू. नगरपालिका निवडणुकीत तासगाव, कडेगाव, इस्लामपूरमध्ये विजय मिळाला. वसंतदादांची सांगलीही जिंकली. पृथ्वीराज चव्हाण यांचे कराडही जिंकले. जिल्ह्यात थोडीशी काँग्रेस शिल्लक आहे. विधानसभेला जिल्हा काँग्रेसमुक्त होईल. २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर कोण उभे राहणार नाही. हाच विजय आहे.’’

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना गारद करण्याचा विडा चंद्रकांतदादांनी उचलला आहे. त्यांना किंगमेकर आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांनी साथ दिली. सांगलीतील विजय २०१९ च्या राजकारणाची दिशा ठरवणारा आहे.’’

आमदार गाडगीळ म्हणाले, ‘‘सांगलीचा निकाल न भूतो न भविष्यती आहे. नागरिकांच्या विश्‍वासाला पात्र राहू.’’
प्रदेश संघटक कुलकर्णी, माजी आमदार पाटील, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, नीता केळकर, सुरेश आवटी यांची भाषणे झाली. श्री. देशमुख यांनी स्वागत केले. नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, रमेश शेंडगे, दीपक शिंदे, दिलीप सूर्यवंशी, वैभव शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Chandrakant Patil comment