देशमुख विरोधकांचा पैसा पाण्यात जाईल : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

कडेगाव - संग्रामसिंह व पृथ्वीराज देशमुख या दोन भावांमध्ये नम्रता आहे. त्यामुळे कोणी कितीही पैसा ओतला तर त्यांचा निवडणुकीमध्ये त्यांचा ऐंशी हजार मतांचा गठ्ठा कायम आहे. त्यामध्ये काही फरक पडत नाही असा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. 

कडेगाव - संग्रामसिंह व पृथ्वीराज देशमुख या दोन भावांमध्ये नम्रता आहे. त्यामुळे कोणी कितीही पैसा ओतला तर त्यांचा निवडणुकीमध्ये त्यांचा ऐंशी हजार मतांचा गठ्ठा कायम आहे. त्यामध्ये काही फरक पडत नाही असा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. 

तोंडोली (ता. कडेगाव) येथे तालुक्‍यातील ३० कोटी  ११ लाख रुपये खर्चाच्या रस्ते कामांचे भूमिपूजन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. 

‘‘पतंगराव कदम वेगळे होते. त्यांनी सहज जरी कोणाच्या खांद्यावर हात टाकला तरी लोकांना वाटायचे की किती मोठा माणूस माझ्या खांद्यावर हात टाकतोय. परंतु ते आता नाहीत. त्यामुळे त्यांची जादू आता चालणार नाही.

- चंद्रकांत पाटील,  महसूलमंत्री

मंत्री म्हणाले, ‘‘दुष्काळी पट्ट्यात शासनाला केवळ पिण्याच्या पाण्याची चिंता आहे. तर अजूनही पाऊस पडेल अशी आशा आहे. आणि जर नाही पडला तर शासन राज्यात निश्‍चितपणे दुष्काळ जाहीर करेल आणि मदतही करेल.’’

संग्रामसिंह देशमुख म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोचविल्या आहेत. आज भूमिपूजन झालेल्या रस्त्यांचे ३० कोटींच्या निधीतून कामे होतील.’’

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, नीता केळकर उपस्थित होते. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम  गरुड, पंचायत समितीच्या सभापती मंदाताई करांडे, उपनगराध्यक्ष रवींद्र कांबळे, पलूसच्या सभापती सीमा मांगलेकर, जि. प. सदस्या रेश्‍मा साळुंखे, शांता कनुंजे, अश्‍विनी पाटील, धनंजय देशमुख, जितेंद्र पवार, विजयकुमार चोपडे, प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख, तहसीलदार अर्चना शेटे उपस्थित होते. भगतसिंग मोहिते यांनी आभार मानले.

Web Title: Chandrakant Patil comment