धनंजय महाडिक खासदार, अमल होणार मंत्री - चंद्रकांत पाटील

धनंजय महाडिक खासदार, अमल होणार मंत्री - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर -: देशात जोपर्यंत पक्षापेक्षा काम महत्त्वाचे मानले जात नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. खासदार धनंजय महाडिक कोणत्या पक्षाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत हे मला माहीत नाही; मात्र ते आजही खासदार आहेत आणि ते पुन्हा खासदार असतील. तसेच, आमदार अमल महाडिक सध्या आमदार आहेत. ते दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर मंत्री असतील, असे सूचक वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  येथे केले. सदर बाजार येथील सांस्कृतिक सभागृहाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

श्री. पाटील म्हणाले, सदर बाजारमधील प्रॉपर्टी कार्डाचा,  
सरकारच्या योजना आणून घरांचा प्रश्‍नही सोडवू; पण तोपर्यंत काय करायचे? अनेकांची घरे झाली आहेत. परंतु, गिलावा करण्यासाठी आर्थिक खर्च पेलवत नाही. अशांना मदत करण्यासाठी ज्यांच्या-ज्यांच्या खिशाला परवडेल, ते काम केले पाहिजे. कॉलनीमध्ये तर नक्कीच केले पाहिजे. शिक्षण आणि खेळामध्ये मुली पुढे गेल्या पाहिजेत. 

एका कॉलनीमध्ये एकूण पाच हजार घरे आहेत. ती घरे नवीन कधी होतील माहिती नाही. तोपर्यंत या पाच हजार घरांचे गिलावे पूर्ण करून रंगरंगोटी करायला सांगितले तर ते काम करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्यासारखे अनेक लोक उत्सुक आणि माझ्या कॉन्टॅक्‍टमध्ये आहेत.

धनंजय महाडिक हे खासदार होण्याआधीपासून लोकोपयोगी कामावर खर्च करत आहेत. सदर बाजारमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांना महाडिक यांनी शिक्षणाची सोय करू दिली असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, नगरसेविका स्वाती माने, मारुती माने आदी उपस्थित होते. 

विरंगुळा केंद्राचे काम सुरू करा
सदर बाजार येथे विरंगुळा केंद्र उभारावे, अशी मागणी नगरसेविका स्मिता माने यांनी केली. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी जागा असेल तर उद्यापासून या कामाला सुरुवात करावी, अशी सूचना केली. अनेक आमदार, खासदारांनी बांधलेले सांस्कृतिक हॉल बंद आहेत. त्यामुळे नगरसेविका स्मिता माने व मारुती माने यांनी अशा पद्धतीचे सांस्कृतिक हॉल वापरात आणून सवलतीच्या दरात ते लोकांना उपलब्ध करून दिले पाहिजेत, असे आवाहनही पाटील यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com