विरोधकच एकमताने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतील - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

सांगली - मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय निवडणूक समोर पाहून जाता जाता घेतलेला नाही. अजून एक वर्ष बाकी आहे. अनेक पत्ते खिशात आहेत. त्यामुळे वर्षानंतर विरोधकांनाच आपण निवडणूक लढवू नये यावर एकमत करावे लागेल, असा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

सांगली - मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय निवडणूक समोर पाहून जाता जाता घेतलेला नाही. अजून एक वर्ष बाकी आहे. अनेक पत्ते खिशात आहेत. त्यामुळे वर्षानंतर विरोधकांनाच आपण निवडणूक लढवू नये यावर एकमत करावे लागेल, असा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

भाजपने मराठा समाजाला राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या निकषावर १६ टक्के आरक्षण जाहीर केले. त्याचे गॅझेटही झाले. पण विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे नेते आरक्षणाचा निर्णय निवडणूक पाहून जाता जाता घेतला असल्याची टीका करत आहेत.

यावर सांगलीत पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, मागासवर्गीय आयोगाने चार वर्षे यासाठी मेहनत घेतली आहे. ४५ हजार कुटुंबांचा सर्व्हे केला आहे. तसेच २ लाख ८० हजार निवेदने पाहिली आहेत. तुमच्यासारखे ऑफिसमध्ये बसून अहवाल केलेला नाही असा टोला हाणत राणे समितीने घाईघाईत केलेल्या अहवालाचाही त्यांनी समाचार घेतला.

ते म्हणाले, आम्ही जाताजाता आरक्षण दिलेले नाही. अजून आमच्याकडे एक वर्ष हातात आहे. खूप पत्ते खिशात आहेत. वर्षभरात यापेक्षाही अधिक पत्ते बाहेर काढू. जम्मू काश्‍मिरचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी विरोधकांनी आता २०१९ ची निवडणूक लढवून पैसे वाया घालवण्यापेक्षा सरळ २०२४ ची निवडणूक लढवावी असे म्हटले होते. वर्षभरात आणखी पत्ते बाहेर काढू. त्यामुळे विरोधकांमध्येच पुढच्या वर्षीची निवडणूक लढवू नये यावर एकमत करावे लागेल.

जिद्दीने आरक्षणाचा निर्णय
मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या श्रेयवादाचाही समाचार त्यांनी घेतला. ते म्हणाले, मराठा आरक्षण हा राजकीय अजेंडा नाही. त्याचे श्रेय कुणी घेण्याची गरज नाही. असेलच तर फक्त मुख्यमंत्र्यांनाच याचे श्रेय द्यावे लागेल. त्यांनी मोठ्या जिद्दीने सगळ्या अडचणींवर मात करून आरक्षणाचा निर्णय घेतला.

Web Title: Chandrakant Patil Comment