Maratha Reservation : हरिश साळवे बाजू मांडणार : चंद्रकांत पाटील

सदानंद पाटील
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

कोल्हापूर - मराठा समाजाला सरकारने 16 टक्‍के आरक्षण दिले आहे. मागासवर्गीय आयोगानेच हा समाज मागास असल्याचे म्हंटले आहे. यातच पन्नास टक्‍के लढाई जिंकली आहे. उर्वरीत 50 टक्‍के लढाई न्यायालयात लढण्यासही सज्ज असून शासनाने यासाठी न्यायालयात तज्ञ वकिलांची फौज नेमल्याचे सांगत, मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीतही टिकेल, असा विश्‍वास महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केला.

कोल्हापूर - न्यायालयातही आरक्षण टिकावे, यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांचेसह 20 विधीज्ञांची टीम उभी करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच मराठा समाजाला सरकारने 16 टक्‍के आरक्षण दिले आहे. मागासवर्गीय आयोगानेच हा समाज मागास असल्याचे म्हंटले आहे. यातच पन्नास टक्‍के लढाई जिंकली आहे. उर्वरीत 50 टक्‍के लढाई न्यायालयात लढण्यासही सज्ज आहोत. मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीतही टिकेल, असा विश्‍वासही महसूलमंत्री पाटील यांनी व्यक्‍त केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबददल कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्यावतीने मंत्री पाटील यांचा शासकीय विश्रामगृह येथे सत्कार करण्यात आला. 

शिवाजी महाराजांनी गनिमीकावा करुन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. तसाच गनिमीकावा याबाबतीतही करणे आवश्‍यक होते. मी आणि मुख्यमंत्र्यांनी त्यापध्दतीनेच गनिमी कावा केला.

-  चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

मंत्री पाटील म्हणाले, अहवाल पटलावर ठेवू नये, असे आम्ही वारंवार खासगीत सांगत होतो. कारण कोट घालून लोक तयार आहेत, फक्‍त बटणं लावायचे बाकी आहेत, हे सांगत होतो. कारण आम्हाला पुढची शक्‍यता माहिती होती, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. 

मागासवर्गीय आयागानेच मराठा समाजाला मागास म्हटल्याने, इथेच निम्मी केस संपली आहे. मात्र न्यायालयात मराठ्यांच्या मागासलेपणावर आव्हान दिले जावू शकते. तसेच ते 50 टक्‍केपक्षा अधिकचे आरक्षण दिले जात असल्याबददल आक्षेप घेतले जातील. मात्र आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी बऱ्याचा कलमांचा आधार घेतला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार यात काही शंका नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. मराठा समाजाला उरलेल्या 32 टक्‍केत अर्ज करता येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

प्रसिध्द विधीज्ञ हरिष साळवे मांडणार बाजू 
न्यायालयातही आरक्षण टिकावे, यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांचेसह 20 विधीज्ञांची टीम उभी करण्यात येणार आहे. या वकिलांचे मंगळवारी संध्याकाळी मुंबई येथे दोन तासांचे ब्रेन स्टॉर्मिंग सेशन होणार आहे. तर हरिष साळवे यांची दिल्ली येथे 7 तारखेला भेट घेण्यात येणार आहे. यासाठी खास सरकारी विमान बुक करण्यात आले असून 12 जणांची टीम साळवे यांना भेटून या केसची दिशा ठरवली जाणार आहे. 

बाबा पार्टेनी नवीन आंदोलन घ्यावे 
मराठा आरक्षणाबाबत आंदोलन झाले. याबददल आमचे काही मत नाही. आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे. आंदोलकांवरील गुन्हे आता मागे घेतले आहेत. त्यामुळे आता हा विषय संपला आहे. त्यामुळे बाबा पार्टे यांनी नवीन आंदोलन शोधावे, असा टोला मंत्री पाटील यांनी हाणताचा, सर्किट हाउस परिसरात एकच हशा पिकला.

Web Title: Chandrakant Patil comment