..तर हेमामालिनी, रेखा पंतप्रधान झाल्या असत्या

..तर हेमामालिनी, रेखा पंतप्रधान झाल्या असत्या

कागल - प्रियांका गांधी काँग्रेसच्या सभेत येणे हे नवीन नाही. आमचा समाज सेलिब्रिटींना मत द्यायला नव्हे, तर त्यांना बघायला येतो. तसे असते तर हेमामालिनी, रेखा या देशाच्या पंतप्रधान झाल्या असत्या. विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आपल्या सरकारने काय-काय केले? आणि काय-काय करणार आहे, हे लोकांना सांगावे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केली.

शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या कार्यकर्त्यांच्या येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात युतीच्या ४५ जागा जिंकूच, पण राज्यातली एकही जागा सोडायची नाही, असा आमचा निर्धार आहे, देशात सरकार येण्यात महाराष्ट्राची प्रमुख भूमिका राहील. कोल्हापूरची जागा राज्यात विक्रमी मतांनी विजयी होईल, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला.

पुढचा बॉम्ब खूपच मोठा असल्याचा गौप्यस्फोट करीत पालकमंत्री पाटील म्हणाले, की सगळे बॉम्ब फोडून झाल्यावर मी मतदारसंघातच तळ ठोकून असणार आहे.

शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, की या निवडणुकीने कागलच्या राजकीय विद्यापीठात नवा अध्याय सुरू होत आहे. अपुऱ्या वेळेमुळे गत निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. पण, या वेळी सर्वांच्या पाठबळामुळे निवडणूक जिंकणे सोपे झाले आहे. जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली.  

‘म्हाडा’-पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, की सदाशिवराव मंडलिक यांचा वारस खासदार झाला पाहिजे. यासाठी मंडलिक यांना विक्रमी मताधिक्‍य मिळवून देऊया. माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, ‘‘कार्यकर्त्यांना आम्ही दैवत मानतो. सगळी शक्ती एकवटूया आणि मंडलिक यांना विक्रमी मताधिक्‍याने खासदार करूया.’’

प्रा. सुनील मगदूम यांनी स्वागत केले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांनी प्रास्ताविक केले. महेश घाटगे यांनी आभार मानले. 

या वेळी शिक्षण सभापती अंबरिश घाटगे, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष संजय पवार, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची भाषणे झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com