भाजपला मिळालेल्या प्रतिसादामुळेच कॉंग्रेस, सेनेला पोटसूळ- चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे कर्तत्व आणि शिवसेनेचे अपयश यामुळे त्यांच्याकडे माणसे रहायला तयार नाहीत. भाजपकडे ओघ वाढला आहे. त्यामुळेच त्यांना पोटशूळ झाला आहे, अशी जोरदार टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केली. ते पत्रकारांशी बोलत होते. 

सांगली- कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे कर्तत्व आणि शिवसेनेचे अपयश यामुळे त्यांच्याकडे माणसे रहायला तयार नाहीत. भाजपकडे ओघ वाढला आहे. त्यामुळेच त्यांना पोटशूळ झाला आहे, अशी जोरदार टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केली. ते पत्रकारांशी बोलत होते. 

ते म्हणाले, "या तीनही पक्षांची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडे अशी झाली आहे. भाजपच्या प्रतिसादामुळेच पैशांचा पाऊस पाडतोय, अशी टीका केली जात आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीला रोखणे, हे पहिले प्राधान्य आहे. त्यासाठी समविचारी पक्षांना आमची दारे नेहमी उघडी आहेत. गेल्या वीस वर्षातील भ्रष्टाचारी कारभाराने जनता हैराण झाली आहे. त्यामुळे जनतेचे सत्ताधारी विरोधी वातावरण आहे. भाजप हा सक्षम पर्याय आहे आणि लोकांनी तो निवडायचे निश्‍चित केले आहे. मनपावर भाजपचा झेंडा फडकणार यात शंका नाही.''
 
तसेच ते म्हणाले की, "भाजपकडे मोठ्या संख्येने लोक येताहेत. 78 चांगले उमेदवार आम्ही निवडू, मात्र ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांना फारकाळ नाराज राहण्याची गरज नाही. त्यांनी पक्षाच्या कामाला लागावे, योग्यवेळी योग्य संधी दिल्या जातील. ही निवडणूक लोकसभा, विधानसभेची नांदी आहे. येथून भाजप सुसाट सुटेल.

शेट्टींच्या आंदोलनावर टीका 
दूध, भाजीपाला रस्त्यावर टाकणे, हेच तुमचे आंदोलन आहे का? शेतकरी घाम गाळून उत्पादन घेतो आणि ते रस्त्यावर फेकता, वाह रे तुमचे आंदोलन, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते म्हणाले, रास्तारोको करा, मोर्चे काढा, मात्र शेतमाल रस्त्यावर टाकणे योग्य नाही. दूधाला चांगला दर मिळाला पाहिजे, या मागणीसाठी आंदोलन योग्यदिशेने करावे. मुंबईला दुधाचा थेंब देणार नाही, असे म्हणणे योग्य नाही. हा मुंबईकरांचा अवमान आहे. मुंबई काय पाकिस्तानात आहे का?

Web Title: chandrakant patil criticise on congres and shivsena