चंद्रकांत पाटील यांच्या ‘ईडी’ चौकशीच्या व्हिडीओने खळबळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि आपल्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न कोणी तरी खोडसाळपणे केला असून, व्हायरल झालेला व्हिडिओ त्याचाच एक भाग आहे. मी हा व्हिडिओ केलेला आणि पाहिलेलाही नाही, असे स्पष्टीकरण राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिक्कोडे यांनी पत्रकाद्वारे सांगितले.  

मंत्री पाटील यांच्या संपत्तीची ‘ईडी’मार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणारा श्री. क्षीरसागर यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून राजकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यावरूनच हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. 

पत्रकातील माहितीप्रमाणे,  शनिवारी (ता.२३) सोशल मीडियावर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बोललेला जुना चुकीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबाबत क्षीरसागर यांनी स्पष्टीकरण दिले असून, हा व्हिडिओ माझा नाही तसेच तो खोडसाळपणे कोणी तरी दिल्याचे सांगितले.  समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. 

काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हा व्हिडीओ व्हायरल केल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत जिल्हा पोलिसप्रमुखांकडे तक्रार नोंदवण्यात आली. असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना योग्य ती शिक्षा पोलिस प्रशासनाकडून दिली जाईल, अशी ग्वाही क्षीरसागर यांनी सांगितले असून, याविषयी पोलिस पुढील कारवाई लवकरच पूर्ण करतील, अशी माहिती राहुल चिक्कोडे यांनी पत्रकातून दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil ED inquiry Viral Video issue