…ए गप्प म्हणत, चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्ताला झापलं (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तक्रार करणाऱ्या एका पूरग्रस्ताला झापलं असल्याचं समोर आलं आहे. कोल्हापुरात पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना एका पूरग्रस्ताने चंद्रकांत पाटील यांना शेतीच्या सातबाऱ्यासंबंधी विचारला असता त्यांनी ए गप्प असे म्हणत त्याला खाली बसवलं.

सांगली : राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तक्रार करणाऱ्या एका पूरग्रस्ताला झापलं असल्याचं समोर आलं आहे. कोल्हापुरात पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना एका पूरग्रस्ताने चंद्रकांत पाटील यांना शेतीच्या सातबाऱ्यासंबंधी विचारला असता त्यांनी ए गप्प असे म्हणत त्याला खाली बसवलं. चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्ताला अशी वागणूक दिल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.

शिरोळीमधून रोड सुरु झाला तर आपल्याला जे हवं ते आणता येईल. म्हणून मी आपणा सर्वांना प्रार्थना करेन की विचलित न होता, न घाबरता…सरकार पूर्णपेणे आपल्या पाठिशी आहे याची खात्री बाळगा. तक्रारी करुन काही होणार नाही. सूचना करा….प्रशासनाला तक्रारी करुन काय होणार? बिचारे 24-24 तास झोपलेले नाहीत, असं चंद्रकांत पाटील बोलत होते.
 

याचवेळी लोकांमध्ये बसलेला एक पूरग्रस्त उभा राहून आपली व्यथा मांडतो. चंद्रकांत पाटील यावेळी त्याला सगळं करतो सांगतात आणि शेवटी वैतागून ए गप्प म्हणत खाली बसायला सांगतात. चंद्रकांत पाटील यांनी अशा भाषेचा वापर केल्याने पूरग्रस्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil hit the flood affected person