दादांचे सांगली, कोल्हापूरवरच प्रेम!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

सातारा - विविध चार महामंडळांच्या अध्यक्षपदाच्या निवडी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केल्या. या निवडीत सांगली, कोल्हापूरला स्थान दिले गेले आहे. पण, राजकारणासाठी साताऱ्याशी नेहमी संपर्कात असलेल्या चंद्रकांतदादांनी साताऱ्यातील भाजपच्या एकाही नेत्याला महामंडळावर संधी दिली नाही. त्यामुळे साताऱ्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. 

महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्‍त्या जूनमध्ये जाहीर होणार अशी चर्चा होती. त्यामुळे महामंडळावर वर्णी लागेल, या आशेने साताऱ्यातील भाजपचे काही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क ठेवून होते. सातारा जिल्ह्याच्या राजकारणात चंद्रकांत पाटील यांनी जरा जास्तच लक्ष घातले आहे. नुसते लक्ष घातले नाही तर शेखर चरेगावकर, अतुल भोसले यांना राज्यमंत्री दर्जाची पदे दिली. त्यामुळे ते महामंडळाच्या नियुक्तीत साताऱ्यातील भाजपच्या नेत्यांना संधी देतील, अशी अपेक्षा होती. पण, त्यांनी या सर्वांच्या आशेवर पाणी फिरवून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात महामंडळांचे अध्यक्षपद दिले. मुळात कृष्णा खोऱ्यांतर्गत बहुतांशी प्रकल्प हे सातारा जिल्ह्यात आहेत. त्यामुळे आजपर्यंत या महामंडळांवर साताऱ्यातीलच नेत्यांना उपाध्यक्षपदावर संधी मिळाली होती.

यामध्ये उदयनराजे भोसले, (कै.) भाऊसाहेब गुदगे, आनंदराव पाटील, रणजितसिंह निंबाळकर यांचा यामध्ये समावेश होता. पण, यावेळेस साताऱ्याला वगळून सांगलीचे खासदार संजय पाटील यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्षपद दिले आहे. खासदारांना पहिल्यांदाच हे पद दिले गेल्याने राजकीय वर्तुळातून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

साताऱ्याला डावलल्यामुळे... 
साताऱ्याला डावलल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. साताऱ्यातून अनेकजण महामंडळासाठी ‘फिल्डिंग’ लावून बसले होते. पण, चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयामुळे या सर्वांच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे. 

Web Title: chandrakant patil politics BJP