भाजपची पुन्हा सत्ता येणार नाही म्हणणारा मंदबुद्धीचा: चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज म्हणून उदयनराजे यांच्या विषयी आदर आहे. याऐवजी वेगळा उमेदवार असता, तर सातारा लोकसभेतही परिवर्तन दिसले असते. मात्र वाई विधानसभेत मदन भोसले यांचा विजय निश्‍चित आहे.

खंडाळा (जि. सातारा) : महाराष्ट्रात पुन्हा भाजपाची सत्ता येणार नाही, असे म्हणणारा हा आंधळा, बहिरा किंवा मंदबुध्दीचा ठरेल, अशी टीका करून विधानसभेत भाजपाचीच सत्ता येणार असल्याचा दावा महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. 

खंडाळा येथील मी लाभार्थी सन्मान सोहळ्यात मंत्री पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार मदन भोसले, ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अनुप सुर्यवंशी, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष वनिता शिर्के उपस्थित होते. 

मंत्री पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज म्हणून उदयनराजे यांच्या विषयी आदर आहे. याऐवजी वेगळा उमेदवार असता, तर सातारा लोकसभेतही परिवर्तन दिसले असते. मात्र वाई विधानसभेत मदन भोसले यांचा विजय निश्‍चित आहे. राष्ट्रीय काँग्रेसला दोन महिने झाले तरी, राष्ट्रीय अध्यक्ष मिळत नाही. गत लोकसभेच्या निवडणुकीत निम्म्या राज्यात काँग्रेसचा एकही खासदार निवडुन आला नाही.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil slams opposition for win BJP in Maharashtra