मंदिरे उघडण्यासाठी  चंद्रकांतदादांचा घंटानाद 

शंकर भोसले 
Saturday, 29 August 2020

मिरज ः सहा महिन्यांपासून बंद असलेली मंदिर-मस्जिदे सरकारने तत्काळ सुरू करण्यासाठी भाजपच्या वतीने मिरजेतील मैदान दत्तमंदिर बाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

मिरज ः सहा महिन्यांपासून बंद असलेली मंदिर-मस्जिदे सरकारने तत्काळ सुरू करण्यासाठी भाजपच्या वतीने मिरजेतील मैदान दत्तमंदिर बाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मिरजेतील मैदान दत्तमंदिर बाहेरील घंटा वाजवून घंटानाद आंदोलनाचे रणशिंगार फुंकले. यावेळी त्यांनी राज्यातील दहा हजार मंदिराबाहेर हे आंदोलन सुरू असल्याचे सांगितले. 

यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, अनलॉक एक, दोन आणि तीन चार मध्ये शिथिलता देत राज्य सरकारने कारखाने, व्यापार पेठा, मॉल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दारूची दुकाने सुरू केली. त्यांना सोशल डिस्टंन्स, सिनिटायझर अशी नियमावली लागू केली. पण राज्यातील मंदिरे आणि मस्जिदे आद्यापही बंद का सगळं सुरू होणार असेल तर मंदिरे बंद का असा सवाल पाटील यांनी केला. 

यावेळी महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती संदिप आवटी, उपमहापौर आनंदा देवमाने, माजी महापौर संगिता खोत, नगरसेवक निरंजन आवटी, पांडूरंग कोरे, गणेश माळी, जिल्हा सरचीटणीस मोहन वाटवे ओंकार शुक्‍ल, बाबासाहेब आळतेकर, अजिंक्‍य हंबीर, सुमेध ठाणेदार आदि उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakantdada's bell rang to open the temples

फोटो गॅलरी