चंद्रकांतदादा, दो गज की दुरी, सत्ता की लालच बुरी ! - जयंतरावांची टोलेबाजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारविरोधात आंदोलनाचे स्वरुप स्पष्ट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पत्र लिहले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री जयंत पाटील यांनी सडकून टीका केली आहे.

सांगली ः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारविरोधात आंदोलनाचे स्वरुप स्पष्ट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पत्र लिहले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री जयंत पाटील यांनी सडकून टीका केली आहे.

जयंतरावांनी फेसबूक पोस्टव्दारे म्हटले आहे, की चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश दिले आहेत. हे आदेश देण्यापेक्षा महाराष्ट्रधर्म पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असते तर अधिक संयुक्तिक ठरले असते. दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी !

येत्या 22 मे रोजी म्हणजे शुक्रवारी भाजप राज्यभर आंदोलन करणार आहे. त्याबाबतच्या सूचना देण्यासाठी चंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांनी एक पत्र लिहले आहे. चंद्रकांतदादांच्या पत्राचा फोटो अपलोड करत जयंतरावांनी त्यातील सूचलनांना लाल रंगाने अधोरेखित केले आहेत.

त्यात चंद्रकांतदादांनी म्हटले आहे, की कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना काळ्या फिती लावाव्यात, काळे कपडे असतील तर ते परिधान करावेत. निषेधाच्या घोषणा काळ्या शाईने लिहाव्यात. फोटो काढून माध्यमांकडे पोहोच करावेत. मुख्यत्वे "उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार' असे फलक लावावेत. याशिवाय "ठाकरे सरकार हाय हाय', "सोरोना संकटाला जबाबदार, ठाकरे सरकारचा भोंगळ कारभार', "महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, उद्धव सरकार मात्र आपल्या घरात', अशा घोषणा देण्याची सूचनाही चंद्रकांतदादांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrakantdadas letter and jayant patil answer