बावनकुळेंची उद्या अण्णा हजारेंशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

राळेगणसिद्धी - अवैध दारू व्यवसाय, तसेच अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामसुरक्षा दलास कारवाईचा अधिकार देण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती. याबाबत कायद्याचा मसुदा तयार झाला आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी राज्य उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी (ता. 19) येथे येत आहेत.

राज्यात अवैध दारू व्यवसाय वाढले आहेत. त्याला आवर घालण्यात पोलिस बळ अपुरे पडत आहे. त्यामुळे ग्रामसभेच्या मान्यतेनंतर गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करून त्यास अवैध व्यवसायांवर कारवाईचा अधिकार देण्याची मागणी हजारे यांनी मुख्यमंत्री व राज्याच्या सचिवांकडे केली होती. त्यास सहमती दर्शवताना कायदा कसा असावा, याबाबत मंत्री, सचिव व हजारे यांनी वेळोवेळी चर्चा केली. कायद्याचा मसुदा तयार आहे. त्यास मंत्रिमंडळानेही मान्यता दिली आहे.

Web Title: chandrashekhar bavankule discussion with anna hazare