जिल्हा सहकारी बॅंकांना नोटा बदलून द्या - पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

श्रीरामपूर - केंद्र व राज्य सरकारने जिल्हा सहकारी बॅंका व सहकार क्षेत्रास सावत्रपणाची वागणूक न देता मदत करावी. बॅंकांमधील हजार-पाचशेच्या जुन्या नोटा बदलून द्याव्यात, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केले.

बारामती सहकारी बॅंकेच्या शाखेचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार भाऊसाहेब कांबळे होते. साईबाबा संस्थानाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, माजी आमदार भानुदास मुरकुटे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, ज्येष्ठ नेते माणिकराव जगधने या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा बॅंकेतील जुन्या नोटांचा प्रश्‍न निकाली काढण्याची सूचना दिली आहे. त्याची अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. शेतमालाला आधारभूत किंमत दिल्यास शेतकरी मदतीसाठी कोणाच्या दारात जाणार नाही. सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नये; त्याची तूर खरेदी करावी.''

Web Title: change the notes to district cooperative bank