पारंपरिक पीकपद्धती बदला : नितीन गडकरी

पारंपरिक पीकपद्धती बदला : नितीन गडकरी

राहुरी विद्यापीठ : "देशात साखर, तांदूळ, गहू, डाळींचे उत्पादन प्रचंड वाढले आहे. परदेशातील या वस्तूंचे भाव भारतापेक्षा कमी आहेत. यातील अनेक वस्तूंचे दर आपल्या हातात नाहीत, ते परदेशातच ठरविले जातात. त्यामुळे पारंपरिक पीकपद्धती बदलून आता शेतकऱ्यांनी तेलबिया, बांबू, तसेच इथेनॉल तयार होईल, अशा पिकांचे उत्पादन घ्यावे,'' असा सल्ला केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिला. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 33 व्या पदवीप्रदान समारंभात मंत्री गडकरी यांचे स्नातकांना उद्देशून दीक्षान्त भाषण झाले. अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. विद्यासागर राव होते. पालकमंत्री राम शिंदे, कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, अधिष्ठाता (कृषी) डॉ. अशोक फरांदे, कुलसचिव डॉ. दिलीप पवार, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार प्रकाश गजभिये, डॉ. के. व्ही. प्रसाद, डॉ. भास्कर पाटील, तुषार पवार, नाथाजी चौगुले, सुनीता पाटील, डॉ. पंकजकुमार महाले, डॉ. विजयप्रकाश ठोंबरे, डॉ. किरण कोकाटे, डॉ. शरद गडाख, विजय कोते, मिलिंद ढोके आदी उपस्थित होते. 

समारंभात 45 विद्यार्थ्यांना पीएच. डी. 401 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 4010 विद्यार्थ्यांना पदवी, अशा एकूण 4411 विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यात आल्या. सन 2017-18मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवीत प्रथम आलेली रूपाली शिनगारे, बी.एस्सी. (उद्यानविद्या)मध्ये प्रथम आलेली श्रुती सावंत, कृषी अभियांत्रिकीत प्रथम आलेली शिवानी देसाई यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली. 

कुलगुरू डॉ. विश्वनाथा यांनी विद्यापीठाचा कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचा अहवाल मांडला. राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या "शेतकरी प्रथम' कार्यक्रमाद्वारे कृषी तंत्रज्ञानाचा विस्तार होत असल्याचे त्यांनी सांगितले. माजी कुलगुरू डॉ. सुभाष पुरी, डॉ. शंकरराव मगर, डॉ. एम. सी. वार्ष्णेय, डॉ. तुकाराम मोरे, डॉ. संतराम कदम, डॉ. विजय मेहता या वेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. आनंद सोळंके यांनी केले. 

इथेनॉल बनविणारी पिके घ्या 

गडकरी म्हणाले, ""आपला देश आठ लाख कोटी रुपयांच्या पेट्रोलियम पदार्थांची आयात करतो. देशातच विविध पिकांपासून इथेनॉल तयार केले, तर शेतकऱ्यांच्या खिशात यातील दोन लाख कोटी रुपये सहज जातील. विद्यापीठानेदेखील संशोधनात आमूलाग्र बदल करून शेतकऱ्यांना पीकपद्धतीबाबत योग्य मार्गदर्शन करावे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com