सातारा  हिल मॅरेथॉनच्या मार्गात बदल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

सातारा - हिल मॅरेथॉनच्या रूपाने साताऱ्याचे नाव जगाच्या नकाशावर पोचले आहे. या स्पर्धेच्या संयोजकांना पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शहरातून जाणारा मार्ग बदलावा लागला आहे. येत्या रविवारी (ता. दोन) होणारी सातारा हिल मॅरेथॉन नव्या नियोजनानुसार पोलिस कवायत मैदानाऐवजी तालीम संघाच्या मैदानावरून सुरू होईल. राजपथावरून राजवाडा, गोलमारुतीमार्गे समर्थ मंदिर व तेथून बोगदामार्गे गणेशखिंड व परत येताना शाहू रस्त्याने शाहू चौक व तेथून तालीम संघ असा स्पर्धेचा मार्ग राहील. 

गेली सहा वर्षे साताऱ्यात यशस्वीपणे अर्धमॅरेथॉनचे आयोजन केले जाते. यंदाची ही स्पर्धा येत्या रविवारी (ता. दोन सप्टेंबर) आहे. पोवई नाक्‍यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. मॅरेथॉनपूर्वी कर्मवीर किंवा राजपथापैकी एक रस्ता शिवाजी सर्कल जवळ खुला होण्याची शक्‍यता होती. पावसामुळे ती आता मावळली आहे. हे दोन्ही रस्ते शिवाजी सर्कल येथे बंद असल्याने यावर्षी  मॅरेथॉनचा प्रारंभ पोलिस कवायत मैदानाऐवजी तालीम संघ मैदानावरून होणार आहे. 

पालकमंत्री विजय शिवतारे, खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते रविवारी सकाळी सहा वाजता मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखविण्यात येईल. पावणेसात वाजता ‘फन रन’ या तीन किलोमीटरच्या रेसला प्रारंभ होईल. साडेआठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ होईल. तत्पूर्वी एक सप्टेंबर रोजी अजिंक्‍यतारा साखर कारखाना कार्यस्थळावर अभयसिंहराजे सांस्कृतिक भवनात एक्‍सपो होईल. त्यामध्ये धावपटूंना टीशर्ट बीपचे वाटप होईल. 

सात हजार धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. प्रथमच ही मॅरेथॉन शहराच्या इतक्‍या जवळ येत आहे. सातारकरांनी आपल्या दारात, मॅरेथॉनमार्गाच्या कडेला उभे राहून धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी उभे राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

मॅरेथॉनचा नवा मार्ग
जाण्याचा मार्ग-तालीम संघ-राजपथमार्गे राजवाडा, यादोगोपाळ पेठमार्गे समर्थमंदिर तेथून बोगदामार्गे गणेश खिंडीजवळील पठार. 
परतीचा मार्ग-गणेश खिंड-बोगदामार्गे समर्थ मंदिर- शाहू रस्त्याने अदालतवाडामार्गे शाहू चौक (नगरपालिका कार्यालय) व तेथून तालीम संघावर मॅरेथॉनची सांगता.

Web Title: Changes in the way of Satara Hill Marathon