चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

वाई - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या छातीवर, पोटावर व हातावर चाकूने वार करून पतीने तिचा खून केल्याची घटना बोपर्डी (ता. वाई) येथे पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मेहुणीवरही त्याने वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अरुण परबती बिरामणे (वय 37, रा. वाघजाईवाडी, ता. वाई) याला अटक केली आहे. नीलम (वय 34) असे त्याच्या मृत पत्नीचे, तर वर्षा दत्तात्रय जाधव (22) असे जखमी मेहुणीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, की बोपर्डी येथील ज्ञानेश्‍वर तुकाराम गाढवे यांच्या घरातील एका खोलीत अडीच वर्षांपासून अरुण बिरामणे यांचे कुटुंब भाड्याने राहते. अरुणची पत्नी नीलम व मेहुणी वर्षा या दोघी औद्योगिक वसाहतीतील गरवारे कंपनीत कामाला होत्या. त्या दोघी येथे राहत असत. बिरामणे कुटुंब मूळचे बिरामणेवाडी (ता. जावळी) येथील असून, तीन वर्षांपूर्वी वाघजाईवाडी येथे स्थायिक झाले. अरुण घरची शेती करून वाईतील एका दुकानामध्ये कामाला होता. तो सिद्धेश (वय 9) व शुभम (6) या दोन्ही मुलांसह आईसमवेत वाघजाईवाडी येथे राहतो. अधून-मधून बोपर्डीला येत असे. काल बोपर्डीला आल्यानंतर त्याने मुक्काम केला. पहाटे साडेचारच्या सुमारास शेजारच्या खोलीतून महिलांचा ओरडण्याचा आवाज आल्याने घरमालक ज्ञानेश्‍वर गाढवे यांनी त्यांचे दार ठोठावले आणि काय प्रकार आहे, असे विचारले. त्यावेळी आतून अरुण बिरामणे याने "मी पत्नी नीलम हिचा खून केला आहे. पोलिस आल्याशिवाय दार उघडणार नाही,' असे सांगितले. त्यानंतर गाढवे यांनी घरातील या खोलीचा पार्टीशनचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. अरुणच्या हातात रक्ताने माखलेला चाकू होता. त्याची पत्नी व मेहुणी बिछान्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्याचवेळी अरुण खोलीचा दरवाजा उघडून चाकूसह पळून गेला.

चारित्र्याच्या संशयावरून अरुणने पत्नी नीलमच्या छातीवर, पोटावर व दोन्ही हातांवर चाकूने वार केले. मी सोडविण्यासाठी गेले असता माझ्याही हातावर व छातीवर वार केले, असे वर्षा हिने पोलिसांना सांगितले. पोलिस निरीक्षक विनायक वेताळ तपास करीत आहेत.

Web Title: Character's wife on suspicion of murder