शिवसेनेच्या मोहोळ जिल्हा उपप्रमुख पदी चरणराज चवरे यांची नियुक्ती

राजकुमार शहा 
रविवार, 9 डिसेंबर 2018

मोहोळ : जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी निवडीत मोहोळ तालुक्याला झुकते माप मिळाले असुन महत्वाच्या विविध पदावर चौघांना संधी दिली आहे. पेनुरचे उद्योजक चरणराज चवरे यांची जिल्हा उपप्रमुख पदी, कामतीचे अशोक भोसले यांची तालुका प्रमुख पदी, माजी अध्यक्ष संजय देशमुख यांची विधानसभा संघटक पदी तर, रामहींगणीचे बाळासो वाघमोडे यांची पश्चिम महाराष्ट्राच्या स्टार प्रचारक पदी नियुक्ती झाल्याने जिल्हयात मोहोळचाच वरचष्मा राहिला आहे.

चरणराज चवरे यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. सर्व सामान्याला अडचणीत मदत करणे, रक्तदान शिबीर, पंढरपूर यात्रेवेळी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची फराळ व चहापाण्याची सोय करण्यासारखे सामाजिक उपक्रम राबविले. या कार्याची दखल घेऊन पक्ष श्रेष्ठीनी त्यांना कामाची संधी दिली. जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत, जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी तालुका अध्यक्ष काका देशमुख यांनी तब्बल एक तप सेनेच्या माध्यमातुन शहरासह ग्रामीण भागातील सर्व सामान्याचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांचे वर विधानसभा संघटकाची महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. कामती येथील अशोक भोसले हे ही सेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. कामती परिसरातील शासकीय दवाखाने, रस्त्याचे प्रश्न या सह अनेक सामाजीक अडचणीसाठी त्यांनी अंदोलने केली आहेत. तसेच पक्ष कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपविली आहे.

रामहिंगणीचे बाळासो वाघमोडे यांचे भाषेवर प्रभुत्व आहे. वेगवेगळ्या निवडणुक काळात त्यांनी शिवसेनेची भुमिका व कार्य सर्व सामान्यापर्यंत पोचविण्याचे काम केले आहे .परिक्षेच्या माध्यमातुन त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राच्या स्टार प्रचारक पदाची जबाबदारी सोपविली आहे. चौघांही नेत्यानी शिवसेनेची ध्येय धोरणे सर्वसामान्यापर्यत पोचविवार असल्याचे सांगितले 

Web Title: Charanraj Chavan was appointed by Shiv Sena's Mohol District Deputy Chief