चरस, गांजा मागेल तेथे मिळेल!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - कर्नाटक ते कोल्हापूर व्हाया मिरज असा प्रवास होत असलेल्या अमली पदार्थांची तस्करी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर येऊन ठेपले आहे. गांजा, चरस यांचा पुरवठा ‘मागेल तेथे मिळेल’ अशा पद्धतीने सुरू आहे.

शहरातील मुख्य भागात तर झाकलेल्या रिक्षात त्याचा पुरवठा होत असल्याचे सांगण्यात येते. एका शाळेच्या मैदानावर त्याची विक्री होत आहे. शहरातील हायफाय एरियामध्ये तर मोबाईलवरून संपर्क साधल्यास गांजा दिला जात आहे.

कोल्हापूर - कर्नाटक ते कोल्हापूर व्हाया मिरज असा प्रवास होत असलेल्या अमली पदार्थांची तस्करी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर येऊन ठेपले आहे. गांजा, चरस यांचा पुरवठा ‘मागेल तेथे मिळेल’ अशा पद्धतीने सुरू आहे.

शहरातील मुख्य भागात तर झाकलेल्या रिक्षात त्याचा पुरवठा होत असल्याचे सांगण्यात येते. एका शाळेच्या मैदानावर त्याची विक्री होत आहे. शहरातील हायफाय एरियामध्ये तर मोबाईलवरून संपर्क साधल्यास गांजा दिला जात आहे.

अमली पदार्थांची खुलेआम विक्री करणे हा गुन्हा आहे, तरीही नशेसाठी या पदार्थांची विक्री चोरून होत आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी कोल्हापुरातील उपनगरांत खुलेआम सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून याचा पर्दाफाश केला होता. चित्रपटातील दृश्‍यांप्रमाणे तेथील बैठक व्यवस्था होती. तासांवर त्याचे भाडे होते. आता अशी ठिकाणे कमी झाली आहेत. मात्र, ‘मागेल तेथे पुरवठा’ करणारी यंत्रणा सक्रिय झाली आहे. मोबाईलवरून संपर्क करून विक्रेता ग्राहकांपर्यंत पोचत आहे. ठराविक खाणाखुणांतून हातात पुडी दिली जाते. या वेळी पैसेही सुटे केले जात नसल्याचे सांगण्यात येते. एका हातात गांजाची पुडी आणि दुसऱ्या हातात शंभराची नोट अशा पद्धतीने व्यवहार होत असल्याचे सांगण्यात येते. शहरातील एका पुलाजवळील रिक्षात गांजाची विक्री होते. येथील बंड्या म्हणजे त्याचा केंद्रबिंदू आहे. तेथे येणारे ग्राहक हक्काचे आणि कायमचे आहेत. तेथे केवळ खाणाखुणांवरून हा व्यवहार चालतो. शहरासह ग्रामीण भागातील ग्राहक येथे हक्काचा असल्याचे परिसरातील लोकांना दिसून येते. सकाळी साडेसातपासून त्याची विक्री सुरू होते. शहरातील एका बॅंकेच्या मागे असलेल्या शाळेच्या मैदानावर अमली पदार्थांचा अड्डाच असल्याचे खुद्द ग्राहकच सांगतात. याच ग्राहकांनी गुंगीत आमचे आयुष्य वाया गेल्याचीही कबुली त्यांच्या मित्रांकडे केली आहे. पन्नास रुपयांच्या पुड्यांना अधिक मागणी आहे. येथे तर एक व्यक्ती स्वतः येऊन पुरवठा करीत आहे. टोळकं म्हणून ते या भागात प्रसिद्ध आहेत. शहराचा गावठाण भाग असूनही तेथे पोलिसांचे हात पोचत नाहीत. आयसोलेशन हॉस्पिटल, गांधी मैदान, रिंगरोड, राजारामपुरीतील काही भाग, शाहूपुरी, रंकाळा परिसर, पंचगंगा स्मशानभूमी, पंचगंगा पुलाखाली येथेही याची विक्री होते.

कर्नाटक ते कोल्हापूर व्हाया मिरज
कर्नाटकातून ठराविक रेल्वेतून हा गांजा थेट मिरजेत पोचत असल्याचे सांगण्यात येते. तेथून हा गांजा कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात दिला जात आहे. एसटी बसमधून यायचे आणि ठराविकांना साध्या पिशव्यांतून द्यायचे आणि उलट गाडीनेच पुन्हा मिरजेला जायचे, असे त्याचे रॅकेट असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

Web Title: Charas Ganja Addiction Crime