शैक्षणिक शुल्कवाढीचा झटका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - एखाद्या शाळेने अचानक शुल्क (फी) वाढविले, की पालकांचे डोळे पांढरे होतात. विश्‍वासात न घेता वाढ कशी झाली, याची चर्चा सुरू होते. खिशाला चाट बसली, की सर्व जण जागे होतात. फी संबंधी शासनस्तरावर समिती नेमली गेली. अगदी सनदी लेखापरीक्षक दर्जाच्या व्यक्तीची नियुक्ती झाली. त्याची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून करण्याचे ठरले होते. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. एकाही शाळेत शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्याचे झटके पालकांना बसू लागले आहेत. 

केंद्रीय बोर्डाच्या अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळांनाही नियमांच्या चौकटीत आणण्यात आले. विभागीय स्तरावर शिक्षण उपसंचालक, नंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावर फी संबंधी दुर्लक्ष झाल्याने त्याची झळ पालकांना बसू लागली आहे. 

खासगी शाळांची फी वाढ हा गेल्या काही वर्षापासून चिंतेचा विषय बनला आहे. प्रामुख्याने सीबीएसई, आयसीएसई शाळांचे प्रस्थ वाढल्यानंतर त्यांच्या फीसंबंधी उलटसुलट चर्चा सुरू झाली. दारात स्कूल बस, टकाटक युनिफॉर्म आणि मुलगा कोणत्या शाळेत शिकतो तर सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या शाळांत याचा अभिमान पालकांना होता. 

डोनेशन, फी भरण्याची त्यांची तयारी असते. पहिल्या सत्रात अमुक इतकी फी ठरली होती. दुसऱ्या सत्रात अचानक फी वाढली, की पालक चिंतेत पडतात. 

शैक्षणिक शुल्क नियंत्रण समितीने या सर्व बाबींचा अभ्यास करून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार, देखभाल दुरुस्ती याचा विचार करून फीचे निकष निश्‍चित केले होते. प्रत्येक शाळेत यासाठी समिती आहे. त्यात पालकांचे प्रतिनिधी आहेत. या समितीने फी वाढीला मान्यता दिली, तर ती मान्य करायची असेही समितीने म्हटले होते. मात्र, काही शाळा पालक प्रतिनिधींना विश्‍वासात न घेता फी वाढ करू लागले. 

शिक्षण विभागाच्या स्तरावर शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावर फी वाढीसंबंधीचे नियंत्रण आहे. मात्र अध्यादेश निघाला, की लागू करायचा आणि अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करायचे, अशी मानसिकता आहे. दिवाळीच्या सुटीनंतर शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या सत्रातील फी पालकांनी भरली आहे. दुसऱ्या सत्रातील फीचे नोटीस बोर्डावरील आकडे पाहून काहींचे डोळे पांढरे होऊ लागले आहेत. 

- अधिकाऱ्याकडून अध्यादेश लागू, अंमलबजावणीकडे दुर्लक्ष 

-प्रत्येक शाळेत फी निश्‍चितीसाठी पालक प्रतिनिधीसह समिती 

-समितीवर पालकांचे प्रतिनिधीत्व आवश्‍यक 

-अनेक ठिकाणी पालक प्रतिनिधींना विश्‍वासात न घेताच निर्णय

Web Title: Charges of academic growth