सोलापूर शहरातील धर्मादाय रुग्णालयांची होणार तपासणी 

The charity hospitals will be examined in Solapur city
The charity hospitals will be examined in Solapur city

सोलापूर : शहरातील धर्मादाय रुग्णालयांची महापालिकेच्या विशेष पथकाकडून अचानक तपासणी केली जाणार आहे. या संस्थांनी निकष न पाळल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाईची शिफारस केली जाणार आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या मोहिमेसंदर्भात नुकतीच बैठक घेतली. त्यामध्ये महापालिका हद्दीतील दवाखाने आरोग्याधिकारी, तर ग्रामीण भागातील दवाखाने जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी तपासण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापालिकेच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर शहरात 13 धर्मादाय रुग्णालये आहेत. ती या पथकाकडून तपासली जाणार आहेत. 

धर्मादाय रुग्णालयाची नोंदणी सहायक धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे का, आयपीएफ नोंदणी क्रमांकाद्वारे खाते उघडले आहे का, एकूण खाटांच्या संख्येपैकी दहा टक्के खाटा राखीव आहेत का, युनीटप्रमाणे खाटा आहेत का, पुरुष, महिला व सर्वसाधारण खाटांची संख्या किती, रुग्णालयाला शासनाकडून जागा दिली असल्यास एकूण खाटांच्या संख्येच्या 20 टक्के राखीव ठेवण्यात आल्या आहेत का, दोन टक्के फंड आयपीएफ फंड जमा केले आहे का, बायोक्‍लीन व अग्निशमनदलाचे नुतनीकरण केले आहे का, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला घेतला आहे का, याबाबत चाचणी केली जाणार आहे. 

ही आहेत शहरातील धर्मादाय रुग्णालये -
श्रीमती मल्लव्वाबाई वल्याळ दंत महाविद्यालय, गणेशपेठ व केगाव, अल फैज चॅरीटेबल ट्रस्ट, गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, श्री सिद्धेश्‍वर कॅन्सर हॉस्पिटल, महिला होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज, धनराज गिरजी रुग्णालय, दमाणी हॉस्पिटल, लोकमंगल जीवक हॉस्पिटल, इंडियन कॅन्सर सोसायटी, गांधीनाथा रंगजी हॉस्पिटल व कासलीवाल हॉस्पिटल. 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकांची नियुक्ती केली आहे. शनिवारी (ता.15) महापालिकेच्या पथकाकडून प्रस्तावित दवाखान्यांची तपासणी केली जाणार आहे. 
- डॉ. संतोष नवले, आरोग्याधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com