जकात नाक्‍यांवर तपासणी - रवींद्र खेबुडकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

सांगली - महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी विविध समित्या नियुक्त केल्या आहेत. महापालिका क्षेत्रात अवैध धंदे रोखण्यासह बाहेरून येणाऱ्या गाड्यांच्या तपासणीसाठी आठ ठिकाणी चोवीस तास चेकपोस्ट करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी आज पत्रकारांना दिली. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त येत्या १६ जुलैला सांगलीत आढावा बैठकीसाठी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. खेबुडकर म्हणाले, ‘‘सांगलीवाडी टोल नाका, शिवशंभो चौक-बायपास रोड, माधवनगर नाका, पंढरपूर नाका-मिरज, म्हैसाळ रोड नाका-मिरज, अंकली फाटा-सांगली, सुभाषनगर फाटा-मिरज, तानंग फाटा या आठ ठिकाणी तपासणी नाके असतील. निवडणुकीसाठी पालिका क्षेत्रात सहा ठिकाणी कार्यालये सुरू केली  आहेत. तेथील प्रत्येक अधिकाऱ्याकडे २५ कर्मचारी आहेत. 

सुमारे तीन हजार कर्मचारी निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी नियुक्त केले जाणार आहेत. ५४४  मतदान केंद्रांच्या प्रभागनिहाय मतदारयाद्या संकेतस्थळावर टाकल्या आहेत. पालिकेची स्वतंत्र वेबसाईट, फेसबुक, ट्‌विटर अकाऊंट सुरू होत आहे. एकूण नऊ भरारी पथके नियुक्त केली आहेत. आवश्‍यक तिथे प्रभागासाठीही  पथके असतील.’’ 

अशी होणार अंमलबजावणी
 उमेदवारांसह चार व्यक्तींना अर्ज दाखल करण्यास मुभा. 
 अधिक लोक आल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा. 
 उमेदवारी कक्षात एकूण २० सीसीटीव्हींची नजर.
 दोन दिवसात १८ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज, प्रत्यक्षात एकही नाही.
 विविध करांची थकबाकी भरल्याने १६ लाख जमा.
 सुमारे दोन कोटी थकबाकी वसुलीची शक्‍यता.
 शहरात वाहनफेरीसह धुमाकूळ घालणाऱ्यांवर गुन्हे.

Web Title: Cheaking on Octroi Naka ravindra khebudkar