सांगलीतील व्यापाऱ्यास १४ लाखांना गंडा

सांगलीतील व्यापाऱ्यास १४ लाखांना गंडा

सांगली - येथील व्यापाऱ्यास हैदराबादमधील व्यापाऱ्याने १४ लाख ७० हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. दीपक बंकरलाल तिवारी (हैदराबाद) असे त्या संशयिताचे नाव आहे. अजीज उमर मुल्ला (वय ४३, मंगलमूर्ती कॉलनी) यांनी फिर्याद दिली. त्यांनी तिवारी यास दिलेल्या बेदाणा मालाचे पैसे देण्यास तिवारी टाळाटाळ करत होता. त्यानुसार संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

अजीज मुल्ला हे मंगलमूर्ती कॉलनीत कुटुंबासह राहतात. एस. ए. मसाला नावाने कंपनी आहे. संशयित तिवारी याची श्री बालाजी ट्रेडर्स कंपनी हैदराबाद येथे आहे. दोघांची ओळख होती. त्यामुळे मुल्ला यांनी ७ मे २०१८ मध्ये ४५ लाख ७२ हजार रुपयांचा बेदाणा खरेदी करून हैदराबाद येथे पाठवला. त्यापोटी मुल्ला याने ३१ लाखांची रक्कम  दिली. मात्र, उर्वरित १४ लाखांच्या रकमेसाठी वारंवार मागणी केली. मात्र, तिवारी याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com